मुंबई

साळाव पूल आजपासून तीन दिवस बंद

CD

साळाव पूल आजपासून बंद
दुरुस्तीचे काम ५५ टक्के; पावसाळ्यातही सुरू राहणार दुरुस्तीचे काम
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ ः अलिबाग आणि रोहा-मुरूड तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा येथील साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून लोड टेस्टिंगसाठी पुलावरील सर्वच वाहतूक गुरुवारपासून (ता. ८) तीन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. ३५ वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल धोकादायक स्थितीत असल्याचे स्ट्रक्चर ऑडिटमध्ये आढळले. पुलाच्या ११ खांबांपैकी मधले चार खांब कमकुवत असल्‍याचे आढळल्‍याने पुलाच्या तातडीने दुरुस्ती करण्यात येत आहे. पुलावरील अवजड वाहतूक यापूर्वीच बंद करण्यात केली आहे.
साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम ५५ टक्के झाले असून आणखी काही महिने ते सुरूच राहणार आहे. पाण्याखालील दुरुस्ती, एक्स्पांशन जॉईनिंगचे काम अद्याप शिल्लक आहे. यासाठी पावसाळ्यातही दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे यांनी दिली. कोळसा वाहतूक करणाऱ्या बार्जने दिलेल्या धडकेने हा पूल अधिकच कमकुवत झाला होता. गतवर्षी झालेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्येही तातडीने दुरुस्ती करण्यास सुचवण्यात आले होते. पाच महिन्यापूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले. दुरुस्ती सुरू असताना ५ टनावरील अवजड वाहतूक यापूर्वीच बंद करण्यात आली आहे, आता तीन दिवसांसाठी सर्वच वाहनांसाठी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

अलिबागमार्गे मुरूडला पर्यायी मार्ग
-अलिबाग ते साळावदरम्यान होणारी अवजड वाहनांची वाहतूक अलिबाग, पोयनाड, वडखळ-नागोठणे, कोलाड-रोहा-साळाव मार्गे अथवा अलिबाग-पेझारी चेकपोस्ट, नागोठणे, कोलाड-रोहा, तळेखार-साळाव मार्गे होईल. दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग, बेलकडे, वावे-सुडकोली, रोहा-तळेखार-साळावमार्गे आहे.
- मुरूड-अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरूड-साळाव, तळेखार, चणेरा-रोहा-कोलाड, नागोठणे-वडखळ, पोयनाड-अलिबाग अथवा मुरूड-साळाव-तळेखार, रोहा-कोलाड, नागोठणे-पेझारी चेकपोस्ट-अलिबाग अशी होईल तर दुसरा मार्ग मुरूड-साळाव, तळेखार, रोहा-सुडकोली, वावे-बेलकडे, अलिबाग अशी असेल.

लोड टेस्टिंगचे काम आयएफसी-५१ नुसार होणार असून दरम्यान पुलावरील भार कमी असणे आवश्यक आहे. टेस्टिंगच्या दरम्यान दुर्घटना होण्याची शक्यता असते, हे सर्व टाळण्यासाठी साळाव पुलावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही यास परवानगी दिली आहे.
- राजीव डोंगरे, उप अभियंता, बांधकाम विभाग, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT