मुंबई

मंगलमय दिव्यांची अमावास्या

CD

पाली, ता. १८ (वार्ताहर) : गटारी नव्हे तर मंगलमय दिव्यांची अमावास्या! हा संदेश देऊन सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर शाळेत सोमवारी (ता. १७) ‘दीपपूजा’ उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तबकामध्ये दिव्यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर आपली मंगलमय संस्कृती जपूया! हा संदेश दिला. दीपपूजा साजरी करण्याची वैज्ञानिक कारणे शिक्षक जनार्दन भिलारे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. मुख्याध्यापिका रोहिणी खामकर यांनी दीपपूजेनंतर श्रावण महिन्यात शाकाहार करण्यामागची शास्त्रीय कारणे सांगितली. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र यादव, उपाध्यक्ष नितीन यादव, सदस्या प्रभावती जाधव, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे व केंद्रप्रमुखा अलका फोंडे यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपा पांपटवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT