मुंबई

दाऊदवरील विषप्रयोगामुळे पाकिस्तान अडचणीत

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमच्या संदर्भात पाकिस्तानने जगाला नेहमी चुकीची माहिती दिलेली आहे. दाऊद पाकिस्तानात नाहीच असा दावा सातत्याने त्यांच्याकडून केला जातो आणि तो दावा फोल ठरतो. आताही तेच झाले आहे. दाऊदवरील विषप्रयोगाने पाकिस्तानची परिस्थिती अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे, असे मत ज्येष्‍ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी येथे व्‍यक्त केले.

एका प्रकरणासंदर्भात निकम आज (ता. १८) अलिबाग जिल्हा न्यायालयात आले होते. त्या वेळी त्यांनी दाऊदबाबत आपले मत व्‍यक्त केले. निकम म्हणाले, की दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. दाऊद आमच्या भूमीत नाही, अशी पाकिस्तानची नेहमीच भूमिका राहिली आहे. अधिकृतरीत्या पाकिस्तान हे मान्यच करू शकत नाही. आता दाऊदवर विषप्रयोग झाला आहे, मात्र हा विषप्रयोग भारताने केला, असे पाकिस्तान सांगू शकत नाही.

दाऊदमुळे पाकिस्तान दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. जगासमोर दुटप्पी धोरण येऊ नये, यासाठी सकाळपासूनच देशातील इंटरनेट सुविधा बंद केली आहे. जगासमोर काही गोष्टी येऊ नयेत यासाठी पाकिस्तान असे करतो. पाकिस्तानमधील मीडियानेच दाऊदवर विषप्रयोग झाल्याचे प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांची नाचक्की होत आहे. अमेरिकेनेही दाऊद याला मोस्ट वाँटेड दहशतवादी जाहीर केले आहे. कारण दाऊद हा ‘अल कायदा’ला मदत करीत होता, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.
-----
त्यांनी दाऊदचे अस्तित्व सतत नाकारले!
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दाऊद हा आरोपी होता. यासंदर्भात भारताने सबळ पुरावे दिलेले आहेत. दुबई येथे हा कट रचण्यात आला होता. या कटात कोण कोण सामील होते याचा खुलासा कटात सामील असलेल्या एका आरोपीला माफीचा साक्षीदार बनवून न्यायालयात केला होता. आरोपीने कट कसा रचला, पाकिस्तानमध्ये कसे नेले, पाकिस्तान विमानतळावर आमचे पासपोर्ट कसे तपासण्यात आले नाहीत ते सांगितले होते. यावरून पाकिस्तान सरकारचे त्यांना सहाय्य होते ही बाब स्पष्ट होते. दाऊद हा दहशतवादी म्हणून हवा होता, तो मिळत नव्हता. आम्ही म्हणत होतो तो पाकिस्तानमध्ये लपला आहे; मात्र ते सतत नाकारत होते, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT