मुंबई

आगरदंडा खाडी पुलाची निविदा प्रक्रिया

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : अनेक वर्षांपासून पर्यटकांसह प्रवाशांना आगरदांडा खाडी पुलाची प्रतीक्षा आहे. निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुलाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने दिलेली कमीत कमी रकमेची निविदा मंजूर करण्यात आली आहे. पुलाचे काम काही दिवसातच सुरू होणार असून आगरदांडा-दिघीचा प्रवास सुसाट होणार असल्याचे स्वप्न दाखवले जात आहे.
आगरदांडा ते दिघीला जाण्यासाठी फेरी बोटीद्वारे जावे लागते. पावसाळ्यात ही फेरी बोट बंद असते. याला पर्याय म्हणून मांदाड पुलावरून प्रवास करत पलीकडे तळा, म्हसळा तालुक्यात जावे लागते. यासाठी खूप मोठा वळसा घालावा लागतो. प्रवाशांसह पर्यटकांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आगरदांडा खाडी पूल उभारणीला हिरवा कंदील दाखवला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतीच ४.३ किलोमीटर आगरदांडा खाडी पुलासाठी निविदा उघडली होती. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने ११८७.७६ कोटी आणि ॲफकॉन कंपनीने १२४९.४२ कोटी रुपयांची बोली लावली होती. हिंदुस्थान कंपनीने ॲफकॉनपेक्षा ६१.६६ कोटी रुपयांनी सर्वात कमी बोली लावली होती. रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील टोकेखार, म्हसळा तालुक्यातील तुरुंबडी यांना जोडणारा हा पूल असेल.

बांधकामासाठी ३० महिन्यांची मुदत
जिल्ह्यातील राज्य महामार्ग-४ (रेवस - रेड्डी जलमार्ग) वरील हा दुपदरी पूल महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजूर केला होता. तो अदाणी पोर्ट्स आणि दिघी बंदर प्रकल्पाच्या पूर्वेस बांधला जाईल. यासाठी एकूण ८०९.८९ कोटींचे कंत्राट असून ३० महिन्यांच्या कालावधीत बांधकाम पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामध्ये अतिरिक्त दहा वर्षे देखभाल दुरुस्तीचा कालावधीत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता जारी; ९.३० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपयांची रक्कम हस्तांतरित

Hong Kong Sixes : १,६,६,W,४,६! पाकिस्तानचा ६ चेंडूंत यूएईकडून करेक्ट कार्यक्रम; गतविजेत्यांना फाजील विश्वास नडला अन् गेम झाला Video

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया अडकणार लग्नबंधनात? नात्याची कबुली देत म्हणाली...

Marathi News Live Updates : टोरेंट कंपनीच्या विरोधात २ नोव्हेंबर रोजी कर्जत बंदची हाक

Mumbai Local: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर अपघाताच्या घटना, ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT