मुंबई

बहिरी देवाच्या पालखी सोहळ्याला भाविकांचा प्रतिसाद

CD

बहिरीदेवाच्या पालखी सोहळ्याला भाविकांचा प्रतिसाद
अलिबाग, ता. २९ : अलिबाग तालुक्यातील बहिरीदेवाच्या पालखी सोहळ्याला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्‍साहात पार पडले.
बहिरीचा पाडा येथे प्रसिद्ध देवस्थान बहिरीदेव मंदिर प्रख्यात आहे. पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पहाटे महापूजा, अभिषेक आरती झाल्यानंतर दिवसभरात हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दुपारी दोनच्या सुमारास भव्य उंच काट्यांच्या स्पर्धा पार पडल्‍या. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम कलावंतांनी सादर केला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच मोठ्या प्रमाणात महिला भाविकांनी उपस्‍थित लावली होती. पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे पालखीच्या पुढे भाविक काटेरी पेरी पाठीवर मारतात. यावेळी पाठ रक्तबंबळ होते, मात्र भाविकांना आजवर कुठल्याही वेदना जाणवल्या नसल्‍याचे सांगण्यात येत आहे. हा सोहळा पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातून भाविक आवर्जून येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SP Action Against Police Officer : तक्रार दाखल करण्याची भिती घालून पैसे मागणाऱ्या पोलिसावर एसपींची थेट कारवाई, कोल्हापुरातील घटना

Pregnant Woman: महामार्गावरील कोंडीत मातीच्या ढिगाऱ्यावरच प्रसूती; येवल्यातील सावरगावजवळील घटना; वेदनेचा डोंगर अन् मदतीचा हात!

IND vs PAK: आज एक नाही, तर भारत-पाकिस्तानचे दोन T20 सामने; कधी आणि कुठे पाहाणार? जाणून घ्या

Bengaluru Car Accident : बंगळुरुत आणखी एक भीषण अपघात ! भरधाव कार दुभाजक ओलांडून बसला धडकली, पाच जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी; ४९० तक्रारदारांना २ कोटी ९० लाखांहून अधिकचा जप्त मुद्देमाल परत

SCROLL FOR NEXT