मुंबई

विद्यार्थ्यांनी नोकरी देणारे उद्योजक व्‍हावे

CD

विद्यार्थ्यांनी नोकरी देणारे उद्योजक व्‍हावे
विद्यार्थी चर्चासत्रात प्रा. डॉ. कारभारी काळे यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : मनुष्य केवळ पदवीनेच पूर्ण होत नसतो. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना, असा सल्ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी काळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ फोरम ऑफ इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राइझ, लोणेरे व पदविका विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजक-विद्यार्थी चर्चासत्रात संबोधित करताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी आपले आचार-विचार, नितीमत्ता, कार्यक्षमता आणि आपले उद्दिष्ट यावर लक्ष केंद्रित करून आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजे, असेही मत त्यांनी मांडले.
आपल्या परिसरातील सामाजिक, राजनैतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक अडचणी समजून त्यावर नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करून उद्योजकीय प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्‍यांनी केले. चर्चासत्रात प्रोमंत्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विराज पाटील, प्रमुख पाहुणे आणि यशस्वी उद्योजक यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्योगाची यशोगाथा सांगितली. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रात आपले करियर करावे, असे आवाहन केले. आपल्या आजूबाजूला अनेक उद्योग संधी उपलब्ध असून उघड्या डोळ्यांनी ते पाहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पदविका विभागाचे प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे यांनी चर्चासत्राची पार्श्वभूमी सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली. इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. संजय नलबलवार यांनी उत्तम विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत सुरू करण्यात आलेल्या विविध नवीन उपक्रमांबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी इनक्युबेशन सेंटर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अधिकारी, कर्मचारी व उद्योजकता विकास कक्षाच्या समन्वयकांनी अथक प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT