मुंबई

सोगाव विभागात अवकाळीने नुकसान

CD

अलिबाग, ता. १४ : तालुक्यातील सोमवारी आलेल्या अवकाळी पावसाने सोगाव विभागातील शेतकऱ्यांचा आंबा, भाजीपाला, वीटभट्टीधारक, बांधकाम व्यावसायिक व इतर सर्व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही मिनिटांच्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले, शिवाय परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
नुकतेच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, तो काहीसा खरा ठरला. सोमवारी (ता.१३ ) दुपारी चारच्या सुमारास सोगाव विभागात अचानक वातावरण बदल होत वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. त्‍यामुळे आंबा, भाजीपाला, वीटभट्टी व्यावसायिकांच्या कच्चा विटांचे, बांधकाम साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्याने वीटभट्टी व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उघड्यावर राहणाऱ्या कामगारांच्या तात्पुरत्या असलेल्या झोपड्यांचे छप्पर उडाल्याने जीवनावश्यक वस्तू भिजून संसार उघड्यावर आले. आंबा, काजूची फळगळती झाल्‍याने सरकारने सोगाव विभागातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील थळे यांनी केली.

अलिबाग : सोगावमध्ये मजुरांच्या झोपड्यांचे छप्पर उडाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT