मुंबई

मतमोजणीसाठी प्रशासनाची सज्जता

CD

मतमोजणीसाठी प्रशासनाची सज्जता
अलिबाग, ता. १ : रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात होत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी शनिवारी याठिकाणी भेट देत नियोजनाची पाहणी केली.
मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करण्याचे विविध कक्ष, सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था, माध्यम कक्ष, मतमोजणी पथके, वाहनतळांची जागा निश्‍चिती, वाहतुकीत बदल या अनुषंगाने संबंधित अधिकारी-कर्मचार्‌यांशी चर्चा केली. तसेच केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
मतमोजणीच्या अनुषंगाने विविध घटकांना कोणताही त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यादृष्टीने सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना त्‍यांनी दिल्‍या. मतमोजणी शांततेत आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पडेल, याची दक्षता घ्यावी, आवश्यक सुविधांची तातडीने व्यवस्था करावी, अशा सूचना जावळे यांनी यावेळी दिल्या. या वेळी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, महेश पाटील, अधिक्षक अभियंता सुखदेवे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT