मुंबई

वर्षभरात बंधाऱ्याची दुरवस्‍था

CD

वर्षभरात बंधाऱ्याची दुरवस्‍था
लाखोंचा खर्च वाया; बांधकाम खचल्‍याने गळती

पाली, ता. ४ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील खडसांबळे येथील नदीवर अवघ्या वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्‍या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. पाण्याची साठवण व्हावी, उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवू नये, यासाठी बांधलेल्या बंधाऱ्याचे बांधकाम एका वर्षात कोसळून बंधाऱ्या खालील बांधकाम एकाच पावसाळ्यात वाहून गेल्‍याने पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे या वर्षी पाण्याची साठवण झाली नाही शिवाय नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.
लाखो रुपये खर्चून बांधलेला बंधाऱ्याची दुरवस्‍था झाल्‍याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे. अशी परिस्‍थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी संबंधित ठेकेदारावर निकृष्ट काम केल्‍याप्रकरणी कारवाई करावी आणि बंधाऱ्याचे काम नव्याने करण्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दगडी बांधकाम वाहून गेल्‍याने बंधारा कोसळला आहे. पाणी साचतच नसल्‍याने ग्रामस्थ, जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्‍यामुळे सरकारने गंभीरतेने लक्ष देत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व पुन्हा बंधारा बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भगदाडामध्ये अडकला तरुण
खडसांबळे येथील निकृष्ट दर्जाच्या बंधारा कोसळून मोठ मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे नदीवर पोहत असताना एक मुलगा पडलेल्या भगदाडामध्ये अडकला होता. सुदैवाने त्याचा जीव वाचला. मात्र पुन्हा अशी जीवघेणी घटना घडू नये, म्हणून लवकरात लवकर बंधारा बांधणे गरजेचे आहे.

बंधार्‌याच्या निकृष्ट कामासंदर्भात संबंधित खात्याचे अधिकारी व ठेकेदार यांची बैठक घेणार आहे. संबंधित कामाची पाहणी करून मग ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.
- लता मोहिते, गटविकास अधिकारी, पाली - सुधागड

पाली ः खडसांबळे येथील बंधार्‌याचे बांधकाम वाहून गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजप मंदिर लुटारूंसोबत की रामरक्षकांसोबत? नागपूरमध्ये उद्धव ठाकरे गरजले...

Rajapur Waterfalls : पावसाळा सुरू होताच राजापुरातील धबधबे ओसंडले; 'या' 5 धबधब्यांचे सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहुल गांधींची पहिली पोस्ट; नेमकं काय म्हटलं?

ITI विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गोवा सरकारचा ऐतिहासिक निर्णय, उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा

Pune News : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

SCROLL FOR NEXT