मुंबई

कार्लेखिंड-वडखळ मार्गावर खड्डेच खड्डे

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३० : मुसळधार पावसाळा सुरू होऊन १५ दिवसही झाले नाहीत तोच कार्लेखिंड ते वडखळ मार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्‍था झाली आहे. लवकरात लवकर महामार्गावरील खड्डे भरा अन्यथा तीव्र जन आंदोलन शिवसेना करण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे युवा जिल्हा प्रमुख अमीर ऊर्फ पिंट्या ठाकूर यांनी निवेदनाद्वारे पनवेल येथील राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्‍यांकडे केली आहे.
अलिबाग-कार्लेखिंड-वडखळ हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे. २४ किमी लांबीच्या या रस्‍त्‍यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सात ते आठ वर्षांपासून नागरिकांना खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करावा लागतो आहे. मध्यंतरी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती, परंतु पुन्हा रस्त्यावर अवस्‍था जैसे थे झाली आहे.
पावसाने जोर पकडल्‍याने अनेकजण वर्षासहलीचे बेत आखत आहेत. त्‍यांच्यासाठी अलिबाग चांगला पर्याय आहे. दैनंदिन प्रवाशांसह कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्‍यामुळे महामार्गावर वीकेण्डला वाहतूक कोंडी होते. त्‍यात खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असल्‍याने कोंडीत आणखीनच भर पडते. शिवाय खड्डे चुकवण्याच्या नादात अपघातही घडतात.
अलिबाग शहराला जोडणाऱ्या वडखळ अलिबाग महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मात्र दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होते.
जिल्ह्याचे मुख्यालय आणि पर्यटन स्थळ असल्याने अलिबागला दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. या शिवाय धरमतर येथील जेएसडब्ल्यू प्रकल्प, पीएनपी पोर्टमधून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. मात्र रस्‍त्‍याच्या दुरवस्‍थेमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
तीनवीरा ते पोयनाड तसेच धरमतर ते वडखळदरम्‍यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकूर यांनी दिला आहे.

कार्लेखिंड ते वडखळ हा रस्‍ता महामार्गाला जोडणारा आहे. काही वर्षांपूर्वी या रस्‍त्‍याची दुरुस्ती करण्यात आली होती. आता नव्याने रस्त्याच्या वस्तुस्थिती अभ्यासून उपाययोजना करण्यात येतील.
- यशवंत घोटकर, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT