मुंबई

महावितरणच्या अधिकाऱ्यांना मेणबत्ती, दिवा भेट

CD

पाली, ता. ९ (वार्ताहर) ः ऐन पावसाळ्यात सुधागड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यावसायिक हैराण झाले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून सोमवारी (ता. ८) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाली वीज वितरण उपअभियंत्यांना मेणबत्ती व दिवा भेट देऊन अनोखे आंदोलन केले. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
ग्राहक नियमितपणे वीज बिल भरतात तसेच ते वेळेत न भरल्‍यास विलंब शुल्‍क आकारले जाते अथवा तातडीने वीज जोडणी तोडण्यात येते. मात्र गेल्‍या महिन्याभरापासून तालुक्‍यात ठिकठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. आठवड्यातून एक दिवस देखभाल-दुरुस्‍तीसाठी शटडाऊन घेतले जाते, मात्र तरीही वारंवार बत्ती गुल होत असल्‍याने नागरिक हैराण झाले आहेत. लवकरात लवकर वीजपुरवठ्‌यातील त्रुटी दूर कराव्यात अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड, तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जगताप, नारायण जाधव, भागवत गायकवाड, प्रशांत गायकवाड, नीतेश पवार, बाळाराम गायकवाड व आनंद जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT