मुंबई

शेकापच्या महिला कार्यकर्त्यांकडून निषेध मोर्चा

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ : शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा अपमान केल्याप्रकरणी महिला कार्यकर्त्यांकडून अलिबाग तालुक्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे महिला नेत्या आक्रमक झाल्या असून त्‍यांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला.
शेकापच्या महिला युवा कार्यकर्त्यांनी पेझारी येथील निषेध मोर्चात राजा केणींसह सचिन धुमाळ यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे. सध्या शिंदे गटाचे लोक बोलण्याचे तारतम्य पाळत नाही. शेतकरी आणि महिलांचा अपमान करणे हाच त्‍यांचा अजेंडा असल्‍याची टीका भैरवी जाधव यांनी केली. शेकाप तालुका महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी पेझारी नाका येथे राजा केणी व सचिन धुमाळ यांच्याविरोधात निषेध मोर्चा काढला. मोर्चाला मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांना महिलांकडून निवेदन देण्यात आले. तसेच, महिलांचा अनादर केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चित्रलेखा पाटील यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

अलिबाग ः शेकापच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT