मुंबई

वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

CD

पाली, ता. १७ (बातमीदार) ः वातावरणातील बदल, वादळी वारा, थोडासा पाऊस पडला तरी दिवसरात्र कधीही वीज गायब होते. एकदा वीज गेली की दोन-तीन तास येत नाही आणि आलीच तरी दाब कमी-जास्‍त होत असल्‍याने सुधागडमधील नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत तक्रार करूनही महावितरण विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्‍यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी (ता. १५) वीज महावितरण अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन जाब विचारला.
सुधागड तालुका हा ग्रामीण भागात मोडतो. येथील अनेक गावे दुर्गम भागात असून आदिवासी वाडे-पाडड्यांची संख्या मोठी आहे. तालुक्‍यातील खेड्यापाड्यात दोन-दोन दिवस वीज गायब असते. ऐन सणासुदीत बत्ती गुल होत असल्‍याने नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

वीजखांबांची दुरवस्‍था
अनेक गावांमध्ये विजेचे खांब गंजले असून मोडकळीस आले आहेत. विद्युत डीपी उघड्या आहेत, तर वीजवाहिन्या लोंबकळत आहेत. त्याकडेदेखील महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. वीज गेल्‍यावर काही गावांत चार ते पाच तासांनी लाइनमन पोहोचतो, तर वीजपुरवठा सुरळीत होण्यास पाच-सहा तास लागतात. याशिवाय वारंवार वीज खंडित होत असल्‍याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

खंडित विजेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्‍नशील आहोत. तालुक्यात ८० किलोमीटरचा फिडर आहे. ग्रामीण भाग असल्याने वीज केव्हा जाते आणि कुठे जाते, हे शोधायला वेळ जातो. आमचे लाइनमन, अधिकारी सतत कामावर असतात. ग्राहकांना अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा आमचा प्रयत्‍न आहे.
- बालाजी चात्रे, उपअभियंता, वीज महावितरण कार्यालय, पाली

पाली ः वीज वितरण अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Aizawl No Honking Traffic Discipline : ३ तास ट्रॅफिक जाम, तरीही एकाही गाडीचा हॉर्न नाही! मिझोरामच्या 'या' शहरातील शिस्त पाहून आनंद महिंद्राही थक्क; म्हणाले, "देशाने धडा घ्यावा..."

SCROLL FOR NEXT