मुंबई

भाताला २ हजार ३०० चा हमीभाव

CD

भाताला दोन हजार ३००चा हमीभाव

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : खरीप हंगामातील भात खरेदी लवकरच राज्य सरकारकडून सुरू होईल; परंतु शेतकऱ्यांमध्ये भाताची विक्री करण्यात फारसा उत्साह दिसत नाही. यंदा सर्वसाधारण ११७ रुपये हमीभाव वाढवण्यात आला आहे. वाढती महागाई, शेतीसाठी वाढलेला खर्च याच्या प्रमाणात ही वाढ अत्यल्पच असून शेतकऱ्यांना तुटपुंज्या वाढलेल्या हमीभावात भाताची विक्री करावी लागणार आहे. गतवर्षी सर्वसाधारण भाताला २,१८३ रुपये भाव देण्यात आला होता. यंदा दोन हजार ३०० रुपये देण्यात आला आहे.
जिल्ह्यात २८ भात खरेदी-विक्री केंद्रांना मार्केटिंग फेडरेशनकडून परवानग्या मागवण्यात आल्या आहेत. यात आणखी आठ केंद्रांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्‍ताव तयार करण्यात आला आहे. लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यात भात खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. पिकामध्ये पाण्याची आर्द्रता कायम असल्याने काही दिवस पीक उन्हामध्ये सुकावे लागणार आहे. याचदरम्यान या २८ भात खरेदी-विक्री केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.
गतवर्षी असमाधानकारक पाऊस असतानाही जिल्ह्यात खरिपासाठी सहा लाख ५१ हजार क्विंटल भातपिकाची विक्री शेतकऱ्यांनी केली होती. यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस पडल्याने भाताचा उतारा चांगला होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात टप्प्याटप्प्याने रायगड जिल्ह्यात २८ भात खरेदी केंद्रे करण्यात येणार आहे. या केंद्रांवर सर्वसाधारण भात दोन हजार ३०० रुपये किमतीला विकता येणार आहे.
गतवर्षीपेक्षा ११७ रुपयाने जादा हमीभाव यंदा भात उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे. वाढलेल्या महागाईच्या दृष्टीने ही वाढ खूपच अल्प प्रमाणात आहे, अशी संतप्त भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून येत आहे. मनुष्यबळामध्ये कपात करण्यासाठी कापलेल्या भाताचे भारे घरात न आणता शेतातच झोडणी करून भाताची परस्पर विक्री करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो; मात्र भात खरेदी केंद्र सुरू न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती; मात्र निवडणूक प्रक्रियेमध्ये गुंतलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही.

-----
अ दर्जासाठी वाढीव २० रुपये
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रती क्विंटल दोन हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यात ‘अ’ दर्जाच्या भाताच्या किमतीत साधारण २० रुपयांचा फरक असणार आहे. तसेच, यावर्षीही राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कमदेखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना भाताची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर करायची आहे, त्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून देण्यात आली आहे.
-----

उत्पादन खर्च कमीत कमी करण्यासाठी झोडणीनंतर धान घरी न आणता तो परस्पर विकण्याचा प्रयत्न असतो. यासाठी लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक आहे. हलवा जातीचे भातपीक तयार झालेले आहे. काही दिवसांत खलाटकरांची कापणी सुरू होईल, यादरम्यान भाताची उचल होणे गरजेचे आहे.
- शांताराम पाटील, प्रयोगशील शेतकरी, अलिबाग
----
खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश शासनाकडून अद्याप प्राप्त झाले आहेत. पुढील काही दिवसांत जीआर निघेल त्यानुसार विक्रीसाठी पाठवलेल्या भाताची आर्द्रता किती असावी, वाहतूक, विक्री पद्धत यासंदर्भातील माहिती सहकारी संस्थांना देण्यात येईल. रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारण २८ भात खरेदी केंद्रे सुरू केले जातात, यावर्षीही तितकेच सुरू होतील. शेतकऱ्यांना वाहतूक करणे सोयीचे होईल, अशाच मध्यवर्ती ठिकाणी असतील.
- के. टी. ताटे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT