मुंबई

यलकोट यलकोट जय मल्हार..!

CD

येळकोट... येळकोट... जय मल्हार!

चंपाषष्ठीनिमित्ताने खंडोबाचे पूजन; उत्सवाला ऐतिहासिक परंपरा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी ही चंपाषष्ठी अथवा मार्तंडभैरव षष्ठी म्हणून सर्वत्र साजरी होते. याच चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. यानिमित्ताने जिल्ह्यात ठिकठिकाणी शनिवारी खंडोबाचा उत्सव जल्लोषात साजरा केला. आपल्या कुलदैवताबद्दल अपार श्रद्धा असलेल्या कोळीबांधवांनी खंडोबाचा जन्मोत्सव भंडाऱ्याची उधळण करीत साजरा केला.
अलिबाग परिसरात खंडोबा उत्सवाची दोनशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. ज्या कोळीबांधवांना जेजुरीला जाऊन चंपाषष्ठीला खंडोबाचा उत्सव करता येत नाही, त्यांच्यासाठी खंडोबाचा फार पूर्वी अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे दरबार सुरू झाला. त्यानंतर संगमेश्वर येथे मंदिर बांधण्यात आले. आता अलिबाग कोळीवाडा आणि वरसोली येथील मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो.
अलिबाग मच्छीमार सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रवीण भगत उत्सवाबद्दल सांगतात, मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेल्या दिवसापासून मार्तंडभैरव उत्‍सवाला प्रारंभ होतो. या मासाचा पहिला दिवस ‘खंडोबाची नवरात्री’ आणि ‘देवदिवाळी’ म्हणून कोकणात साजरी झाल्यानंतर सहा दिवसांच्या उत्सवाचा समारोप होतो. यानिमित्ताने मंदिरात सहा दिवस पारायण ठेवले जाते. शनिवारी चंपाषष्ठी साजरी करीत असताना याच दिवशी खंडोबाचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. ज्या परिवारांमध्ये खंडोबा कुलदैवत आहे, तिथे चंपाषष्ठीनिमित्त कुलाचार-कुलधर्म करण्याची परंपरा आहे. तत्पूर्वी पाच दिवस अनेक घरांमधील सदस्यांनी उपवास केला होता. सहाव्या दिवशी खंडोबाची षोडशोपचारे पूजा करून महानैवेद्य दाखवला गेला. या निमित्ताने देव्हाऱ्यात अखंड नंदादीप तेवत ठेवत, तर मंदिरात भंडाऱ्याची उधळण करीत जन्मोत्सव साजरा केला गेला. मल्हारी मार्तंड हा भगवान शंकराच्या अवतारांपैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो. घरोघरी मार्तंड भैरवाची म्हणजे मल्हारी मार्तंड देवतेची विधिवत पूजा करून भंडारा उधळत तळी उचलण्याचा विधी केला जातो.

कोळीबांधवांचा मोठा सहभाग
अलिबाग येथील खंडोबा मंदिरात अलिबाग, साखर आक्षी, रायवाडी, किल्लेपाडा येथील कोळीबांधव येतात, तर वरसोली येथील मंदिरात वरसोली, चालमला, रेवस बोडणी, थळ, थेरोंडे येथील कोळी समाजातील मानकरी आपल्या कुटुंबासह येऊन खंडोबाचा उत्सव साजरा करतात. या दोन ठिकाणी साजऱ्या करण्यात येणाऱ्या जन्मोत्सवाला मोठ्या उत्सवाचे रूप आलेले आहे. तर, ज्यांच्या परिवारांमध्ये खंडोबा हे कुलदैवत आहे त्यांच्याकडेही घरगुती स्वरूपात उत्सव साजरा केला जातो.

दोनशे वर्षांची परंपरा
अलिबाग तालुक्यातील खंडोबा उत्सवाला दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. अलिबाग कोळीवाडा खंडोबा देवस्थानाचे गुरुवर्य चिंतामणी भगत सांगतात, पूर्वी जेजुरीला जाऊन खंडोबारायाचे ज्यांना दर्शन घेता येत नसे, त्यांच्यासाठी वरसोली येथे खंडोबाचा दरबार सुरू झाला. येथील खंडोबाच्या प्रतिमा शके १८४६ मध्ये तयार केलेल्या आहेत. यास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीपासून खंडोबा उत्सव वरसोली येथे सुरू आहे. त्यानंतर संगमेश्वर येथे आणि अलिबाग येथे शाखा सुरू झाल्या; मात्र या सर्वांना दर चार वर्षांनी जेजुरीला प्रतिमा पालखीतून घेऊन जाव्या लागतात. कोळी लोकांची खंडोबावर अपार श्रद्धा असून ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे, असे भगत सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Jalna–Jalgaon Project : जालना-जळगाव रेल्वेचा मार्ग मोकळा! ५,८०४ कोटींचा निधी मंजूर; लवकरच भूसंपादन सुरू

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Mahur News : माहूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी! पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेले; टिपर मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या आनंदनगर उड्डाण पुलावर अपघात

SCROLL FOR NEXT