मुंबई

बॅनरबाजीने अपघातांना निमंत्रण

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११ : आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने राजकीय नेत्यांचे बॅनर काढल्यामुळे सर्व रस्ते मोकळे झाले होते; मात्र निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांच्या अभिनंदनाचे भलेमोठे बॅनर लावण्यात कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली आहे. नेत्याच्या विजयात आपला सहभाग किती मोठा आहे, हे या बॅनरमधून दाखवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांचा दिसत आहे. या बॅनरबाजीने रस्ते, चौक परिसर विद्रूप झाला आहे.
बॅनरबाजीवर सरकारी स्तरावर निर्बंध आणावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. गावागावांतील नाक्यावर विजयी उमेदवारांचे बॅनर लावण्यात आले आहेत. आधीच अरुंद रस्‍ते त्‍यात अनेक ठिकाणी अवघड वळणावर बॅनर लावण्यात आल्‍याने अपघाताची शक्‍यता वाढली आहे. निकाल लागल्यानंतर आपल्या नेत्याची मंत्रिपदावर वर्णी लागावी, याकडे लक्ष वेधणारेही बॅनर आहेत.
तीन दिवसांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा देणारे भलेमोठे बॅनर लावण्यात चढाओढ लागली आहे. काही दिवसांतच येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे यात आणखीनच भर पडणार आहे. कमी खर्चात नेतेमंडळींना प्रसिद्धी मिळत असल्याने बॅनर लावण्यातच जिल्ह्यातील कार्यकर्ते धन्यता मानत आहेत; मात्र यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना नाहक त्रास होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

२० दिवसांत १५ कोटींची उलाढाल
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर आतापर्यंतच्या २० दिवसांत बॅनरबाजीची उलाढाल १५ कोटींच्या घरात पोहोचली आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत हा ओघ कायम राहील, अशी शक्‍यता बॅनर प्रिंटिंग व्यावसायिकांकडून वर्तवण्यात येत आहे. निकाल लागल्यानंतर दिवसरात्र छपाईचे काम सुरू आहे. अद्यापही काही बॅनर छपाई करायचे शिल्लक आहेत. डिझाइन तयार केल्यानंतर त्याची छपाई, लाकडी फ्रेमवर चिकटवणे आणि ते ठरावीक ठिकाणी जाऊन लावणे, अशी वेगवेगळी कामे करणाऱ्यांना यानिमित्त रोजगार मिळाला आहे.

अपघाताची कारणे
* गावाकडचे रस्ते अरुंद असतात. वळणावर असलेल्या झाडी-झुडपांमधून अनेकवेळा समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, अशाच ठिकाणी बॅनर लावल्‍याने वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात होण्याची जास्त शक्यता असते.
* राजकीय नेत्यांचे बॅनर काही वेळेसाठी असतात, त्यामुळे जास्त खर्च न करता लाकडी फ्रेमवर ते चिकटवलेले असतात. जोराचा वारा आल्यावर बॅनर कोसळण्याची शक्यता असते. असे बॅनर वाहनांवर कोसळून अपघात घडल्याचे प्रकार जिल्ह्यात यापूर्वी घडले आहेत.
* काही बॅनर लक्ष वेधून घेणारे असल्‍याने वाहनचालक रस्त्याच्या स्थितीकडे न पाहता बॅनरकडे पाहत वाहने चालवतात. त्यामुळे समोर येणारे स्पीडब्रेकर, खड्डे यांच्याकडे दुर्लक्ष झाल्‍यास अपघात होण्याची शक्‍यता असते.
* शहरातील नाक्यावर लागलेल्या बॅनरमुळे वाहतुकीला नाहक त्रास होत असतो. अनेकवेळा बॅनर लावण्यासाठीही जागा अपुरी पडल्यास कशाही स्थितीत ते लावले जातात. त्यामुळे ते अंगावर पडून दुखापत होण्याची भीती पादचाऱ्यांनाही असते.


बॅनर लावण्यासाठी येणारा खर्च (चौरस फूट)
डिझायनिंग-छपाई - ११ रुपये
लाकडी फ्रेम (रनिंग फूट) - १२ रुपये
लाकडी फ्रेमवर बॅनर चिकटवणे - ५ रुपये
वाहतुकीसह ठरावीक ठिकाणी लावणे - १२ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

SCROLL FOR NEXT