सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११ : विधानसभा निवडणुकीत शेकापच्या एका गटाने अधिकृत उमेदवाराला मदत केली नसल्याने हार पत्करावी लागली होती. या प्रकारानंतर शेतकरी कामगार पक्षातील अंतर्गत कलह समोर आला होता. अशातच माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र ॲड. आस्वाद पाटील यांनी शेकापच्या जिल्हा चिटणीसपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याने दोन गट पडल्याचे चित्र आहे.
शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील यांनी पदाचा राजीनामा देताना लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मंगळवारी सायंकाळी आस्वाद पाटील यांच्या समर्थकांची बैठक पार पडली होती. या बैठकीत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. काही दिवसातच त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या सूनबाई चित्रलेखा पाटील शेकापच्या अधिकृत उमेदवार असतानाही त्यांचे भाचे आस्वाद पाटील, बंधू माजी आमदार पंडित पाटील प्रचारापासून दूर होते. निवडणुकीपूर्वीच त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळेच चित्रलेखा पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.
------------------------------------------
अलिबागच्या उमेदवारीवरून वाद
विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादाने एकेकाळी राज्यात प्रमुख पक्ष राहिलेला हा डाव्या विचारसरणीचा पक्ष फुटीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचला. शेकापला फोडण्यातही भाजपचाच हात असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ॲड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापचा गट भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर शेकापमधील कलह समोर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.