मुंबई

हेटवणेचा शिलकी साठा वापराविना

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १४ : सिडको अखत्यारित खारघर, उलवे, तळोजा, द्रोणागिरी आदी परिसराला पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करूनही हेटवणे धरणात ४४ टक्के उपयुक्त साठा वर्षअखेरीस शिल्लक राहतो; परंतु या साठ्याच्या वितरणासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने शिल्लक राहणारा २९.३० दशलक्ष घनमीटर पाणी भोगेश्वर नदीतून दादरच्या खाडीत सोडले जाते. दहा वर्षांपासून वाया जाणाऱ्या या पाण्यासाठ्याने पेण तालुका सुजलाम-सुफलाम झाला असता; परंतु पुरवठ्याबाबत नियोजनाअभावी आजही पेण तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे.
पेण तालुक्यातील महिलांना डिसेंबरपासूनच पाण्यासाठी धावपळ करावी लागते. मेपर्यंत टंचाईने शिखर गाठलेले असते. रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त पाणीटंचाई पेण तालुक्यात जाणवत असून नागरिक सातत्याने आंदोलने करीत आवाज उठवत आहेत; परंतु ही पाणीटंचाई अद्याप कमी झालेली नाही. नवी मुंबईसारख्या मोठ्या शहराला पाणीपुरवठा करणारे धरण याच तालुक्यात असतानाही हा तालुका कायम टंचाईग्रस्त राहिला आहे. सिडकोने नवी मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी हेटवणे धरणातील ५५.९० दशलक्ष घनमीटर साठा आरक्षित केला आहे. नव्या धोरणानुसार हा साठा वाढवूनही देण्यात आला; परंतु पेण तालुक्यातील नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
पेण हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून निघणाऱ्या २३ किलोमीटरच्या डाव्या कालव्यावर १३ ते २३ किलोमीटर अंतरावर २३ गावे येतात. या गावांमध्ये ३,१०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे सांगितले जात होते. त्याचबरोबर डाव्या तीर कालव्यादरम्यान वडखळ ते खारपाले, खारमाचेला अशा १९ गावांचा समावेश आहे. या सर्व क्षेत्रातील किमान ३,५१६.०० हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते; परंतु पाणी आणण्यासाठी केवळ बंदिस्त पाइपलाइन आणि कालव्याचे काम झाले नसल्यामुळे हे पाणी पेण भोगेश्वरी नदीतून दादरच्या खाडीत सोडले जाते.

५० कोटींचा कालवा प्रस्ताव प्रलंबित
हेटवणे धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी १० वर्षांपूर्वी कालवे बांधण्यासाठी सिंचन योजनेतून ५० कोटींचा निधी तातडीने मिळण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता; परंतु त्यासंदर्भात अद्याप काहीही प्रगती झालेली नाही. पेण तालुक्यातील बहुतांश भाग खाडीकिनारी असल्याने भूर्गभातील पाणीसाठाही क्षारयुक्त आहे. यामुळे धरणातील पाण्याचे वितरण बंद नलिकेद्वारे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पेण तालुक्याचे रुपडे पालटणार!
सुधारित जलनियोजनानुसार, हेटवणे मध्यम प्रकल्पातील ४,२६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शेतीसाठी वापरण्याचे नियोजन आहे. यातील ६० टक्के पाणीसाठ्याचा वापर केल्यानंतरही तालुक्यातील ३,५१६.०० हेक्टर सहज ओलिताखाली येऊ शकतो. त्‍यामुळे शेतकरी बारमाही शेती करू शकतात. संपूर्ण तालुक्याचे हेटवणे धरणामुळे चित्र पालटणार असतानाही राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा तालुका कायम टंचाईग्रस्त राहिला आहे.

लाभधारकांच्या विरोधामुळे रखडले काम
पेण शहरालगतचे नागरीकरण वाढल्‍यामुळे लाभधारकांचा सिंचनासाठीचा प्रतिसाद अत्यल्प आहे. तसेच, कोप्रोली, शिर्की व वाशी वितरिका एकूण ३,१०९ हेक्‍टर क्षेत्र २००७ पासून बंदिस्त नलिका वितरणप्रणाली प्रस्तावित होती; परंतु लाभधारकांच्या तीव्र विरोधामुळे कालव्याची कामे हाती घेता आली नाहीत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहे.

हेटवणे धरणाचे सुधारित जलनियोजन (दशलक्ष घनमीटर)
तपशील/ मंजूर प्रकल्प अहवाल/ फेरनियोजनानुसार पाणीवाटप
पाणी साठा / १४७.४९ / १४७.४९
अचल साठा / २.५१ / २.५१
उपयुक्त साठा / १४४.९८ / १४४.९८
मंजूर बिगर सिंचन आरक्षण / ५५.९०० / ११५.६८
सिंचनासाठी उपलब्ध साठा / ८९.०८ / २९.३०
प्रकल्पीय सिंचन क्षमता / ६०५६ / ४२६८

सिंचन सुविधा नसल्याने नुकसान
नियोजित लाभक्षेत्रास विशेष करून मत्स्यतलावांना व रब्बी पिकांना पाणी न मिळाल्याने भाताचे उत्पादन कमी होऊन जवळपास ४९८.५४ कोटी रुपये नुकसान झाले आहे. तलावातील पाणी एप्रिलमध्ये आटत असल्याने माशांची पूर्ण वाढ न होता कमी किमतीत विकावे लागतात व त्याचेदेखील सुमारे ५,३१७.९३ कोटी रुपये नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बांधावरचे नारळ व इतर भाजीपाला न होऊ शकल्याने ९३६.६६ कोटींचे नुकसान व दूध उत्पादन होऊ न शकल्याने १,५३१.७८ कोटींचे नुकसान झाले असल्‍याचा दावा श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

ज्या लाभक्षेत्रास पाणी मंजूर केले होते, त्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना न विचारता परस्पर बिगर सिंचनासाठी पाण्याचा वापर हेटवणे मध्यम प्रकल्पात झाला आहे. ज्यामुळे एकट्या पेण तालुक्याचे ७,३११.१९ कोटी रुपये इतके नुकसान झाले. पाणी असतानाही पुरेशा सुविधा उपलब्ध होत नसल्याने हा तालुका भकास होत आहे.
- राजन भगत, श्रमिक मुक्त दल

पावसाळ्यात पाण्याची पातळी स्थिर राखण्यासाठी काही प्रमाणात विसर्ग करावा लागतो; परंतु इतर वेळेला तसे करावे लागत नाही. धरणातील पाणी सिंचनासाठी उपयोगात यावे, यासाठी कालवे खोदावे लागणार आहेत, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
- दिनेश्री राजभोज, कार्यकारी अभियंता, हेटवणे मध्यम प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT