सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : महाराष्ट्रातील प्रमुख समुद्री सेवा पुरवठादार आयटीयूएस मरीन कंपनीला उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने कुंभ मेळावा २०२५ साठी बचाव पथके आणि उभयचर बोटी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा करार केला आहे.
प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयार करण्यात येत आहे. ४५ दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातील सुमारे ४० कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा भव्य सोहळ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी सक्षमरित्या पार पाडण्यासाठी उत्तर प्रदेश एटीएसने आयटीयूएस मरीनसोबत करार केला आहे, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थिती आणि बचाव कार्यांमध्ये चांगले व्यवस्थापन शक्य होईल. कराराअंतर्गत, आयटीयूएस मरीन उत्तर प्रदेश एटीएसला उभयचर बोटी आणि प्रशिक्षित बचाव पथके उपलब्ध करून देईल, ज्यामुळे गंगा नदीच्या काठावर आयोजित कार्यक्रमामध्ये गर्दीच्या व्यवस्थापन, हवामानातील अनिश्चितता आणि इतर आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होईल.
कुंभमेळ्याच्या सुरळीत आणि सुरक्षित आयोजनासाठी आयटीयूएस मरीन आपल्या बचाव पथकांचे आणि उपकरणांचे नियोजनपूर्वक स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून वेळेत तैनात करणार आहे. हा उपक्रम कोट्यवधी भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारच्या सक्रिय दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
- अंकित वाघ, प्रवक्ता, आयटीयूएस मरीन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.