मुंबई

शाश्वत विकासामुळे धोंडसे ठरले स्वप्नातील गाव

CD

शाश्वत विकासामुळे धोंडसे ठरले स्वप्नातील गाव
दुग्धव्यवसाय वाढीसह सर्वांगीण विकासावर भर
पाली, ता. २५ (वार्ताहर) ः नाडसूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील धोंडसे गावाला स्वप्नातील गाव म्हणून नुकतेच प्रमाणित करण्यात आले आहे. विविध मानांकने व मापदंडात हे गाव अव्वल ठरले आहे. गावात सर्वांगीण सोयी-सुविधा तसेच रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे गावाचा शाश्वत विकास झाला आहे.
गाव विकास समितीने आपले स्वप्नातील गाव वाटचाल सुरू झाल्यापासून ते आजपर्यंतचे अनुभव अध्यक्ष भारती भोसले यांनी सांगितले. स्वदेस फाउंडेशनच्या मार्गदर्शनामुळे गावातील नागरिकांनी स्वच्छतेवर भर दिला. आरोग्य स्वच्छता व उपजीविका याविषयी अनेक उपक्रम स्वदेस फाउंडेशनच्या वतीने गावामध्ये राबवण्यात आले आहेत. शासनाच्या योजनेमधील वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबवण्यात आलेल्या आहेत. महिलांचे नेतृत्व गावातील एकोपा या वैशिष्ट्यांमुळे स्वदेस व शासन यांच्या समन्वयाने स्वप्नातील गाव निर्माण झाले आहे, असे विजय जाधव यांनी सांगितले. धोंडसे गावाचा स्वप्नातील गाव करण्याचा प्रवास मागील एक वर्षापासून सुरू झाला. दरम्यान, ज्या समित्या स्वप्नातील गाव घोषित झाल्या, त्यांना भेटी देऊन स्वप्नातील गाव करण्याच्या उद्देशाने गावविकास समिती व ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश येऊन वर्षभरात धोंडसे हे स्वप्नातील गाव झाले आहे. स्वप्नातील गाव व कामे करीत असताना स्वदेस फाउंडेशन तसेच शासनाच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले, असे मत ग्रामस्थांनी व महिला मंडळांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वप्नातील गाव पुढील टप्प्यावरती नेण्यासाठी गावविकास समितीने झालेल्या कामाची स्थिती कायम ठेवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्वप्नातील गाव नामफलक अनावरण कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे चेअरमन सुरेश खैरे, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस गीता पालरेचा, पाली नगरसेवक पराग मेहता, तालुका कृषी अधिकारी अशोक महामुनी, सरपंच शाम खंडागळे, उपसरपंच ललिता ठोंबरे, सदस्य सारिका जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक स्वदेश फाउंडेशनचे शिवदास वायाळ, सहाय्यक व्यवस्थापक रवींद्र राऊत, वरिष्ठ समन्वयक सोनाली पवार, वरिष्ठ समन्वयक सिद्धी भगत, गावातील समाजसेवक संदेश जाधव, अविनाश खंडागळे, शिक्षक गोरख आघाव आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
....................
दुग्धव्यवसाय वाढविण्याकरिता स्वदेश व शासनाच्या रॅड या प्रकल्पांतर्गत गाई व म्हशी यांचे प्रकल्प देण्यात आले. तसेच उत्पन्नदेखील दुपटीने वाढविण्याकरिता शेळीपालन, फळबाग लागवड, कुक्कुटपालन असे अनेक प्रकल्प गावात राबविण्यात आले. गावाच्या विकासाबरोबरच जिल्हा परिषद शाळा धोंडसे शाळेला भौतिक सुविधा देऊन तिचा कायापालट करण्यास सहकार्य केले. स्वदेश फाउंडेशनकडून शौचालय युनिट, वर्गसजावट, पाणी फिल्टर, एलसीडी टीव्ही, ग्रंथालय सेटअप, विज्ञान पेटी, सतरंजी इ. साहित्य शाळेला दिले आहे, असे शिक्षक गोरख आघाव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग, भाजप उमेदवार विधानभवनात; शरद पवार, पार्थ पवार अर्ज दाखल करणार

Nagpur Video Viral : संतापजनक! होळी खेळताना अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने चार वर्षांच्या नातवावर ओतलं उकळतं पाणी, कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगलुरु महामार्गावर नवीन कात्र बोगद्याजवळील दरी पुलाजवळ कंटनेर आणि चार वाहनांचा भीषण अपघात

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT