सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : पुणे महापालिकेतील काही जणांकडून बनावट प्रमाणपत्र बनवून दिली जात असल्याच्या प्रकरणाचा दिघी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी शोध लावला आहे. पैसे घेऊन मृत्यूची खोटी नोंद करून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर ठेकेदाराकडे डाटा एंट्री करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.
दिघी पोलिसांनी उघड केलेल्या या प्रकरणानंतर पुणे महापालिकेत सुरू असलेले असे अनेक बोगस प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील फसवणूक प्रकरणाची चौकशी करताना दिघी पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. राजकुमार ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. यातील आरोपींनी संगनमत करून राजकुमार अग्रवाल यांच्याशी नामसाधर्म्य असणाऱ्या व्यक्तीला साक्षीदार म्हणून उभे केले आणि बनावट खरेदीखत तयार केले. गुन्ह्याचा तपास करताना राजकुमार अग्रवाल यांचे कात्रज येथील संतोषनगरमध्ये निधन झाल्याचे समजले. त्यामुळे या व्यक्तीचा धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातून मृत्यूचा दाखला मागवण्यात आला. त्यामध्ये अग्रवाल यांचा मृत्यू २५ मे २०२१ मध्ये झाल्याचे नमूद होते, पण क्षेत्रीय कार्यालयात मृत्यूची नोंद १२ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आली आहे.
खोटी नोंद करून काढले मृत्यूपत्र
दिघी पोलिसांना या मृत्यू प्रमाणपत्राबाबत संशय आल्याने त्यांनी कागदपत्रांची मागणी केली असता, मृत्यूची नोंद करण्यासाठी केलेला अर्ज व अन्य कागदपत्र उपलब्ध नसल्याचे समोर आले. मृत्यूचा दाखला तयार करणारे डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील निगडे व शुभम पासलकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आर्थिक फायद्यासाठी ही मृत्यूची खोटी नोंद करून प्रमाणपत्र काढल्याचे समोर आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.