ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेत दाखल
पाली, ता. १९ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब गटाला राजकीय धक्का दिला जात आहे. नुकतेच सुधागड तालुक्यातील ठाकरे गटातील रायगड जिल्हा उपसंघटक राजेंद्र राऊत, जिल्हा युवासेना समन्वय आशीष यादव, युवासेना माजी जिल्हाप्रमुख सचिन डोबले आदीसह प्रमुख पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते यांनी मंगळवारी (ता. १८) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मंत्रालय येथील शिवसेना बाळासाहेब भवन येथे मंत्री भरत गोगावले, मंत्री संजय राठोड, मंत्री संजय शिरसाठ दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आदी प्रमुखांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.
युवासेना तालुकाप्रमुख नंदेश पालांडे, युवासेना तालुका सरचिटणीस निखिल खामकर, शेकापचे नेते नरेश शिंदे, शिवसेना उपशहरप्रमुख रोहन राऊत, मनसे शहरप्रमुख जयेश चव्हाण, प्रवीण खरीवले, कुंभार शेत ग्रामपंचायत सदस्या वृषाली खरीवले, कुंभारशेत ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील, मुंबई उपशाखाप्रमुख अजित शेलार, नरेश इंदुलकर, अक्षय दळवी, साहिल कापसे, ग्रामपंचायत उपसरपंच दुर्गा वसंत दळवी, अतिश कापसे, रासल ग्रामपंचायत सदस्य मोहन खाडे, रासल शाखाप्रमुख मनोज खाडे, उपशाखाप्रमुख रितेश खाडे, शिवसैनिक सिद्धेश्वर सिद्धेश सुर्वे, दत्ता शिर्के, राकेश सावंत, अडुळशे माजी सरपंच शरद फोंडे, विजय वाघमारे, ज्ञानू यादव, महेंद्र हिलम, संतोष भगत, नेणावली ग्रामपंचायत अनिकेत पडवळ, आधी कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक, ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी रवींद्र देशमुख, संजय म्हात्रे, अनुपम कुलकर्णी, संदीप दपके, सचिन जवके उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.