मुंबई

कावाडे येथील दत्तमंदीराचा वर्धापन साजरा

CD

कावाडे येथील दत्तमंदिराचा वर्धापनदिन साजरा
अलिबाग, ता. २५ : अलिबाग तालुक्यातील श्री दत्तगुरू प्रतिष्ठापणादिनाच्या निमित्ताने कावाडे येथील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय जगन्नाथ जोमा पाटील व त्यांचा परिवार गेली अनेक वर्षे हरिपाठ सोहळ्याचे आयोजन करीत आहेत.
या कार्यक्रमानिमित्त श्री हनुमान महिला हरिपाठ मंडळ देहन, पोयनाड यांनी भव्य कार्यक्रम सादर केला. गायिका संध्या पाटील, मृदंगमणी महेंद्र जुईकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी खारेपाटातील भाविकांना व रसिक प्रेक्षकांना माउली ज्ञानेश्वर, विठ्ठल- रुखमाई, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे विविध अभंग हरिपाठद्वारे सादरीकरण करून  मने  जिंकली. संपूर्ण खारेपाट विभागातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्यांनी महाप्रसादाचा व या धार्मिक कार्यक्रमाचा  लाभ  घेतला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. या वेळी हरिपाठातील महिला मंडळाला प्रेक्षकांनी  पारितोषिक  दिले. तसेच अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अमित नाईक तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल पाटील, पंचक्रोशीतील विविध मंडळी  उपस्थित  होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT