मुंबई

वरसोली समुद्रकिनारी ग्रोयेन्स बंधारा

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १२ : वरसोली हे मासेमारीसाठी एक प्रमुख बंदर आहे; मात्र बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने ओहोटीच्या वेळी मासेमारी नौका बंदरात आणता येत नाहीत. मच्छीमारांची गैरसोय लक्षात घेऊन, मेरिटाइम बोर्डाने ८० कोटी रुपये खर्चून नव्या ग्रोयेन्स बंधाऱ्याचे काम सुरू केले आहे. दोन्ही बाजूला ५०० मीटर लांबीचा बंधारा आणि त्यामधून होड्या जाण्यासाठी गाळ काढण्यात येणार आहे.
वरसोली आणि चालमळादरम्यान खाडीभागात समांतर असणारे ५०० मीटर लांबीचे दोन बंधारे बांधले जाणार आहेत. चालमळा गावातील एका बंधाऱ्याचे ४० टक्के काम अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण झाल्‍यावर वरसोली येथील १५० मच्छीमारांना फायदा होणार आहे. सध्या बंदरात एक हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन केले जाते. भविष्यात हा बंधारा मांडवा, अलिबाग, आक्षी, नागाव येथील मच्छीमारांनाही फायद्याचा होईल.
बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. समुद्रात समांतर बंधारे बांधून झाल्यानंतर त्यातील गाळ काढला जाणार आहे. त्यामुळे ओहोटीच्या वेळेस कमी पाणी असतानाही मच्छीमारांना आपल्या होड्या बंदरापर्यंत आणणे सहज शक्य होणार आहेत. यापूर्वी साताड बंदरात अशा प्रकारचा बंधारा बांधण्यात आला असून येथील मच्छीमारांना त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे वरसोली येथेही अशा प्रकारचा बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी येथील मच्छीमारांची होती.
ऑक्टोबरपासून बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चालमळा बाजूच्या बंधाऱ्याचे काम वेगात सुरू आहे. पुणे येथील सागरी अभियांत्रिकी कामाचा आराखडा तयार करणाऱ्या सीडब्ल्यूपीआरएस या संस्थेने वरसोली येथील ग्रोयेन्स बंधाऱ्याचा आराखडा तयार केला आहे.

बंधाऱ्याला ट्रेटापॉडचे संरक्षण
भूभागापासून ५०० मीटर समुद्रात दोन्ही बंधाऱ्यांचे बांधकाम केले जाणार आहे. समुद्राच्या लाटांमुळे बंधाऱ्याचे दगड ढासळू नयेत, यासाठी दोन, चार आणि सहा टनाच्या ट्रेटापॉडचे संरक्षण दिले जाणार आहे. ट्रेटापॉड बनवण्याचे काम चालमळा येथे सध्या सुरू असून साधारण दोन हजार ट्रेटापॉड्स बंधाऱ्याच्या बाजूने लावले जाणार आहेत.

पूर्वीचा बंधारा निकामी
बंदरात नांगरून ठेवलेल्या मच्छीमारांच्या होड्यांचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण व्हावे म्हणून यापूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. या जुन्या बंधाऱ्याची पडझड झाली आहे. होड्यांच्या वाढत्या संख्येमुळे, बंदरातील जागा कमी पडते. त्‍यामुळे येथे जास्त लांबीचा आणि ओहोटीदरम्‍यान होड्यांची सहज वाहतूक करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या बंधाऱ्याची मागणी २०१२ पासून मत्स्यव्यवसाय विभागाकडे केली जात होती; परंतु काही कारणास्तव ती पूर्ण झाली नव्हती.

मच्छीमारांना ओहोटीदरम्यान होड्या बंदरात आणता याव्यात, यासाठी दोन समांतर बंधारे बांधले जात आहेत. दोन बंधाऱ्यांमधील गाळ काढल्यानंतर होड्यांना जाण्यासाठी पुरेसे पाणी यात असणार आहे, अशी रचना केली जात आहे. चालमळा बाजूच्या बंधाऱ्याचे काम वेगाने सुरू असून लवकरच वरसोली बाजूच्या बंधाऱ्याचेही काम सुरू करण्यात येईल.
- प्रवीण पाटील, उपअभियंता, मेरिटाइम बोर्ड


कोणत्याही परिस्थितीत वरसोलीत बंधारा होणे गरजेचे आहे; मात्र वरसोली बाजूकडील बंधाऱ्याच्या बांधकामाबद्दल आम्हाला काहीही कल्पना दिलेली नाही. या बंधाऱ्याच्या बाजूलाच आमचा गणपती विसर्जन घाट आहे. याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतरच आम्ही बांधकामास अनुमती देणार आहोत.
- मिलिंद कवळे, सरपंच, वरसोली ग्रामपंचायत

---
समीर मालोदे यांनी फोटो पाठवलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत भीषण अपघात; पिकअप-दुचाकी धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT