मुंबई

मच्छीमारांची फायबर बोटींना पसंती

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ : होड्या बनवण्यासाठी आवश्यक मजबूत लाकडांचा तुटवडा भासू लागल्‍याने फायबर बोटींचा पर्याय मच्छीमारांकडून स्‍वीकारला जात आहे. सरकारने फायबर बोटीवरील नियम शिथिल केल्याने लाकडांच्या तुटवड्याने मंदीच्या छायेत गेलेल्या नौकानिर्मिती व्यवसायाने पुन्हा उसळी घेतली आहे.
रायगड जिल्ह्यात आजघडीला १७ लहान-मोठे कारखाने असून, वर्षाला ७० ते ८० मध्यम आकाराच्या मासेमारी नौका तयार केल्या जातात. वर्षानुवर्षे लाकडी बोटींच्या आधारे मासेमारी करणारे मच्छीमार आता वजनाने हलक्‍या फायबरच्या बोटींकडे वळले आहेत. त्याचबरोबर मारेसारीचा फेरा लवकर पूर्ण करता यावा, यासाठी वेग वाढवण्यावरही भर दिला जात आहे. लाकडी बोटींपेक्षा तुलनेने स्वस्त, टिकावू अशा बोटी वरसोली, अलिबाग, आक्षी-साखर, आगरदांडा, जीवना बंदरात मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागल्या आहेत.
बंदरालगतच्या जंगलात विपुल प्रमाणात सापडणारे साग, किंजल, शिसव यांसारख्या वृक्षामुळे येथील नौकानिर्मितीचा व्यवसाय तेजीत होता. नौकानिर्मितीचा पिढीजात व्यवसाय करणारे संजय सुतार यांच्या माहितीनुसार, १९६०नंतर जंगलातून कच्चा माल उपलब्‍ध होण्याचे प्रमाण कमी झाले आणि निर्मिती व्यवसायाला उतरती कळा लागली. त्‍यामुळे या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या बहुतांश कुटुंबांना परंपरागत व्यवसाय सोडावा लागला. अलिबाग येथील कलावती नौकेचे मालक साईनाथ नाखवा यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने फायबर बोटीवरील नियम शिथिल केल्यामुळे नौकानिर्मिती व्यवसायाने पुन्हा गती घेतली आहे.

कमी खर्चात टिकाऊ नौका
आधुनिक तंत्राने बनवल्या जाणाऱ्या नौका कमी खर्चात अधिक टिकाऊ असतात. त्याचबरोबर त्यांची डागडुजी करणेही सोपे असते. माध्यम आकाराची एक लाकडी बोट बांधायला कमीत कमी एक लाखापर्यंत खर्च अपेक्षित आहे. या बोटीसाठी नाबार्ड आणि राष्ट्रीय सहकार संघाच्या माध्यमातून कोळी मच्छीमार कर्ज उचलतात. बोट बांधणीसाठी २५ ते ३० टक्के अनुदानही दिले जाते.

फायबर बोटींना पसंती
मासेमारी व्यवसायाला उतरती कळा लागली असताना बोट दुरुस्‍तीवर वारंवार होणारा खर्च मच्छीमारांना परवडत नाही. कर्जाचे हप्ते, डिझेलचा परतावा देताना नाकीनऊ येतात. मासेमारी करून आल्यावर बोट सुकवावी लागते, तिला वर्षातून एकदा चंद्रसू नावाचे द्रावण चोपावे लागते, रंगरंगोटी, रंधा मारणे, डागडुजीसाठी येणारा खर्च दीड ते दोन लाख रुपये असतो. त्‍या तुलनेत फायबर बोटी कमी खर्चात बांधून होतात. त्यांचा देखभाल-दुरुस्‍तीच खर्चही कमी असतो. त्यामुळे त्या बांधण्याकडे मच्छीमारांचा पसंती मिळत असल्‍याचे थळ मच्छीमार सोसायटीचे संचालक शेषनाथ कोळी सांगतात.

मच्छीमारांचा विश्वास वाढला
उधाणाच्या वेळी समुद्राची दिशा आणि पाण्याचा कल केव्हाही बदलतो. अपघात झाल्‍यास लाकडी बोटींचा विमा मिळवण्यासाठी तसेच बोट दुरुस्तीसाठी जास्‍त खर्च करावा लागतो. या फायबरच्या बोटी बनवणारे क्लाइड हेनरिक सांगतात, आधी प्रायोगिक तत्त्वावर फायबर बोट तयार केली होती, मात्र ती समुद्रात घेऊन गेल्यावर कोळ्यांचाही आत्मविश्वास आला. या मोठ्या बोटी बांधण्यासाठी नवी मुंबई, हैदराबाद येथून कच्चा माल आणण्यात येतो. मुंबईतील चांगले कारागीर जिल्ह्यात येऊन काम करण्यास इच्छुक आहेत.

लाकडी बोटीला फायबर बोटींचा चांगला पर्याय आहे. मासेमारी करणारे कोळीबांधव १० ते १२ वर्षांनी लाकडी बोट कोळीवाड्यातील व्यक्तीला विकतात आणि नवी बोट बांधायला घेतात. ही बोट पाण्यात टिकाव धरणा‍ऱ्या सागवान लाकडाचीच असते, मात्र आता लाकूड मिळण्याचे प्रमाण कमी झाले असून, त्याच्या किमतीही अव्वाच्या सव्वा वाढल्याने बोटींचा खर्च वाढला आहे. फायबर बोटी बनवण्यासाठी कर्ज मिळत आहे. त्‍यामुळे जुन्या बोटी मोडीत काढून नवी बोट घेतानाही फायबरच्या बोटी घेण्याकडे कल वाढला आहे.
- संजय पाटील, सहउपायुक्त, मत्स्यव्यवसाय, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : अंबादास दानवेंसाठी काँग्रेसनं घेतली माघार; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देताना 'मविआ'मध्ये नक्की कोणती झाली 'डील'?

Artificial Mango Ripening : सावधान! तुम्ही खाल्लेला आंबा नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Love Numerology : प्रेमात पक्के 420 असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील कळणारही नाही

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

SCROLL FOR NEXT