मुंबई

महाराष्ट्राच्या बीच कबड्डी संघांचे सराव शिबीर सुरू

CD

महाराष्ट्राच्या बीच कबड्डी संघांचे सराव शिबिर सुरू

अलिबाग, ता. ३१ ः राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांच्या सरावाला वरसोली, अलिबाग येथे प्रारंभ झाला. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आंध्र कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली ५ ते ८ जून या कालावधीत मंगीनापुढी बीच, मचीलीपटनम्, आंध्रप्रदेश येथे बारावी वरिष्ठ पुरुष व महिला गट बीच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ निवडण्यात आले आहेत.
या दोन्ही संघांचे सराव शिबिर अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनाऱ्यावर आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ३१) या सराव शिबिराचे उद्‍घाटन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे. जे. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती पुरस्कारविजेते राजेश पाडावे, महिला संघाच्या प्रशिक्षक लता पांचाळ, पुरुष संघाचे प्रशिक्षक अ‍ॅड. प्रथमेश पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य जनार्दन पाटील, राष्ट्रीय पंच विनोद पाटील, कबड्डीपटू सागर गायकर, प्राण भगत, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. ज्या ज्या वेळी रायगडमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले तेव्हा महाराष्ट्राच्या संघांनी चांगली कामगिरी केली आहे. या वेळीदेखील महाराष्ट्राचे संघ राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करतील, असे जे. जे. पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Raina: क्रिकेट विश्वात खळबळ! सुरेश रैनाला ईडीचं समन्स, आज अधिकारी करणार चौकशी, 1xBet प्रकरण काय आहे?

देवाचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; भीषण ट्रक अपघातात 7 लहान मुलांसह 10 भाविकांचा जागीच मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

Satara News:'गणेशमूर्ती आगमन सोहळ्याने पुन्‍हा दणाणला राजपथ'; ढोल-ताशांचा निनाद, तीन मंडळांनी काढल्‍या मिरवणुका, सातारकरांची गर्दी

Latest Maharashtra News Updates :मनोज जरांगे-पाटील 15 ऑगस्टला नांदेड दौऱ्यावर; जिल्ह्यात ठिकठिकाणी चावडी बैठका सुरू

Satara Accident: दुर्दैवी घटना! 'ट्रकखाली सापडून युवक ठार'; महाविद्यालयातून परतताना काळाचा घाला, म्‍हसवडनजीकची घटना

SCROLL FOR NEXT