एक लाख ८१ हजार पाठ्यपुस्तकांचे वाटप
अलिबाग, ता. १६ ः सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या एक लाख ८१ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच सुमारे ९८ हजार विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्सही देण्यात आले.
शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील, असे नियोजन करण्यात आले होते. नवी कोरी पुस्तके हातात पडताच विद्यार्थी कमालीचे खूष झाले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. पहिल्याच दिवशी नव्या वर्गातील विद्यार्थ्यांची ओळख करून घेणे, त्यांना अभ्यासक्रमाविषयी माहिती देणे, असे नियोजन दिवसभरात झाले. त्याचप्रमाणे अनेक शाळांनी शिक्षकांची बैठक घेऊन वर्षभरात करावयाच्या कामांचे नियोजन केले. तसेच तासिकांचे नियोजन व वेळापत्रकही ठरवले. शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देत त्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने अनेक शाळांनी नियोजन केले आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले; मात्र तरीही शाळेची पहिल्यांदाच पायरी चढणाऱ्या विद्यार्थ्यांना रडू अनावर झाले होते. या विद्यार्थ्यांना आपुलकीने शिक्षक समजावत होते. तसेच त्यांचे शाळेत मन रमावे, यासाठी वर्गात विविध खेळणी ठेवण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.