मुंबई

दी लाईफ फाऊंडेशनतर्फे पन्नास हजार वह्या वाटप

CD

दी लाइफ फाउंडेशनतर्फे पन्नास हजार वह्यांचे वाटप
अलिबाग, ता. २ : लाइफ फाउंडेशनतर्फे रायगड जिल्ह्यातील अलिबाग व सुधागड (पाली) तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी २५ व २६ रोजी ५० हजार वह्यावाटप कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. याबाबत लाइफ फाउंडेशनचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील दी लाइफ फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, स्वच्छता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, गरीब, गरजू, विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्यवाटप करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य करत आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी अलिबाग व सुधागड (पाली) तालुक्यातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना चेंढरे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात एकूण १६८ शाळेच्या ५०७३ विद्यार्थ्यांना २५, ३६५ वह्या वाटण्यासाठी मुख्याध्यापकांना देण्यात आल्या, तर सुधागड (पाली) तालुक्यात पाली शाळा क्रमांक १ येथे ३६४७ विद्यार्थ्यांना एकूण १८, ३२२ वह्या वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमात रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. अलिबागमधील झालेल्या कार्यक्रमात त्यांनी लाइफ फाउंडेशन आणि संस्थेच्या विश्वस्त पूनम लालवाणी यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले. सुधागड (पाली) येथील कार्यक्रमात सुधागड पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण, गट विकास अधिकारी लता मोहिते यांनी उपस्थिती दर्शवून लाइफ फाउंडेशनचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT