मुंबई

खवय्यांचा मासळीवर ताव

CD

खवय्यांचा मासळीवर ताव
बाजारात आवक वाढली; भाव आटोक्यात असल्याने सर्वाधिक खरेदी
पाली, ता. ३ (वार्ताहर) ः पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाल्याने अनेकांनी मांसाहाराकडे आपला मोर्चा वळविला आहे. काही दिवसांपूर्वी श्रावणदेखील संपला आहे. त्यामुळे आता खवय्यांच्या उड्या मासळीवर पडत आहे. तसेच समुद्रात मासेमारीसाठी होड्यादेखील रवाना झाल्या आहेत. परिणामी, जिल्ह्यात सध्या समुद्रातील मासेमारी जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मासळी सापडत असल्याने तिची आवकदेखील वाढली आहे.
श्रावणात मांसाहार बंद असतो. त्‍यानंतर गणेशोत्‍सवात अनेक जण शाकाहारी राहण्याला पसंती देतात. शिवाय, मासेमारीदेखील बंद असल्याने बाजारात मासळीचा तुटवडा असतो. जेणेकरून मासळीचे भाव या काळात सर्वाधिक असतात; मात्र आता श्रावण महिना संपला असून सात दिवसांच्या गणरायाचेदेखील विसर्जन झाले आहे. त्‍यामुळे खवय्यांनी आता मासळीकडे आपला मोर्चा वळविला आहे. दरम्यान, समुद्रातील बंद असलेली मासेमारी पुन्‍हा सुरू झाली आहे. त्‍यामुळे मासे मुबलक प्रमाणात सापडत असल्याने तिचे भावसुद्धा आटोक्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिकांसह येणारे पर्यटक व खवय्यांची चंगळ झाली असून ते मासळीवर ताव मारताना दिसून येत आहेत.
नारळी पौर्णिमेनंतर दर्याला नारळ अर्पण करून बोटी समुद्रात गेल्या; मात्र पुन्हा वादळी वाऱ्यामुळे बोटी किनाऱ्यावर परतल्या; मात्र सध्या वातावरण अनुकूल असल्यामुळे आता पुन्हा मासेमारी सुरू झाली आहे. त्यामुळे मोठ्या विश्रांतीनंतर मासळीची चांगली आवक सुरू झाली आहे. जिल्ह्याला तब्बल २४० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे ताजी मासळी सहज उपलब्ध होते. अनेक स्‍थानिक व पर्यटक खास ताजी मासळी खाण्यासाठी येथे येतात. तर येथील मासळी मोठ्या प्रमाणात मुंबई व इतर शहरातदेखील जाते. कोळंबी, सुरमई, रावस, टोळ, कर्ली, घोळ व पापलेट आदी माशांना पसंती मिळत आहे. बांगडा, बोंबील, मांदेली अशा माशांची सध्या लॉटरी लागत आहे. वडखळ येथील गिरीश म्हात्रे यांनी सांगितले, की श्रावण पाळला होता. श्रावणानंतर गणपती आले, त्यामुळे मांसाहार बंद होता; मात्र आता गणरायाचे विसर्जन केल्यानंतर मांसाहाराला सुरुवात केली आहे. त्यामध्ये माशांना अधिक पसंती आहे.
.................
कोट
श्रावण नुकताच संपला आहे. तसेच गणरायाचे विसर्जनदेखील झाले आहे. त्यामुळे मागील महिन्याभरापासून शाकाहारावर असलेले नागरिक आता मांसाहार करू लागले आहेत. मांसाहारामध्ये मासळीला विशेष पसंती आहे. तसेच गणपतीसाठी अनेक कोकणवासी गावी आले आहेत. त्यांचा कल मासळी खाण्यावर अधिक आहे. मासळीदेखील मुबलक, ताजी व स्वस्त भेटत आहे. खवय्ये खुश आहेत. परिणामी, विक्रीसुद्धा चांगली होत आहे.
- गौरी मनोरे, मासळी विक्रेत्या, पेण-पाली
...................
चौकट
मासळी भाव प्रतिकिलो (ठिकाणानुसार यामध्ये कमी-जास्त भाव आहे.)
बोंबील - २०० ते ३०० रुपये किलो
पापलेट मध्यम - ६०० ते ७०० रुपये किलो
पापलेट मोठे - १,००० ते १,२०० रुपये किलो
सुरमई, रावस - ७०० ते ८०० रुपये किलो
मांदेली - १५० रुपये किलो
लाल छोटी कोलंबी - ४०० रुपये किलो
बांगडा मालवणी - ३०० रुपये किलो
हलवा - ६०० रुपये किलो किंवा (५०० रुपयाला दोन मध्यम आकाराचे)
टोळ - ४०० रुपये किलो
याबरोबरच इतरही विविध प्रकारची मासळी विक्रीसाठी येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandara Accident News : गणपती दर्शनासाठी आलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला; अपघातात पती जागीच ठार, पत्नी जखमी; कुटुंबाचा मन हेलावणारा टाहो

Latest Maharashtra News Updates : दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये उभे असलेल्या गाड्यांना आग

लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी! सामान्यांची रेटारेटी, तर व्हीआयपी गेटवर आमदार पत्र धारकांची झुंबड

Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून वेळेचे काटेकोर नियोजन

Pune News : भारतातील पहिली ‘एडीएएस टेस्ट सिटी’ पुण्यात; ‘एआरएआय’तर्फे उभारणी

SCROLL FOR NEXT