रायगडमधील पर्यटनाला ब्रेक
गडकिल्ल्यांवर जाण्यास मनाई
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : वादळसदृश स्थितीमुळे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या रोडावली आहे. दिवाळीदरम्यान येथील पर्यटन हंगामाला बहर आलेला असतो; परंतु सध्याच्या हवामान बदलामुळे गडकिल्ल्यांवर जाण्यास पर्यटकांना मनाई आहे. जलवाहतूक, समुद्रकिनाऱ्यावरील वॉटरस्पोर्टस् बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला ब्रेक लागला आहे.
समुद्रात नेहमीपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळत असल्याने काशिद, दिवेआगर, हरिहरेश्वर यासारख्या सागरी पर्यटनस्थळांवर जाताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन केले जात आहे. गेटवे-मांडवा या मार्गाने रायगड जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. या जलमार्गावर चालणारी फेरीबोट सेवा खराब हवामानामुळे बंद ठेवावी लागली आहे. फेरीबोटीने येणारे हजारो पर्यटक अलिबाग, काशिद, मुरूड येथे पर्यटनासाठी जात असतात. त्यांची वर्दळ मागील तीन दिवसांपासून थांबली आहे. मेरीटाइम बोर्डाने जंजिरा, पद्मदुर्ग किल्ल्याकडे जाणाऱ्या शिडाच्या होड्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पावसाचा जोर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत या होड्या बंद असणार आहेत. त्यामुळे मुरूडकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचबरोबर कुलाबा, खंदेरी-उंदेरी किल्ल्याकडे जाणाऱ्या होड्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. समुद्र खवळलेला असल्याने खोल समुद्रात जाणे धोक्याचे असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. मॉन्सूनसारखी स्थिती निर्माण झाल्याने किल्ले रायगडवर न जाण्यास पर्यटकांना सांगण्यात येत आहे. यासह ट्रेकिंगसाठी सुधागड, अवचीतगड, इर्शाळगडावर येणाऱ्यांची संख्या घटली आहे.
...
हवामान विभागाच्या सूचनेनुसार जलवाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. हवामान शांत होण्याचा अंदाज जोपर्यंत हवामान विभागाकडून वर्तविला जात नाही तोपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लहान व मध्यम आकाराच्या फेरीबोटी बंद ठेवाव्या लागतील. सध्या मांडवा ते गेटवेदरम्यान आकाराने मोठ्या असलेल्या एम२एम आणि मालदार फेरीबोटी सुरू आहेत.
- आशीष मानकर, बंदर निरीक्षक, मांडवा
-----
फोटो - मंगळवारी फेरीबोटीने परतीच्या प्रवासासाठी रांगेत असलेले प्रवासी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.