मुंबई

विकासाचा श्रीगणेशा

CD

विकासाचा श्रीगणेशा
कुंडलिका पुलाची उभारणी सुरू, रेवस-रेडी सागरीमार्गाला गती
अभय आपटे ः सकाळ वृत्तसेवा
रेवदंडा, ता. २७ ः कुंडलिका खाडीवरील ३.८ किलोमीटरच्या पुलाच्या कामाला गुरुवारी (ता. २७) सुरुवात झाली. रेवस ते रेडी सागरी महामार्गाला प्रत्यक्ष गती मिळणार असून दशकानुदशके प्रतीक्षेत असलेल्या कोकण किनारपट्टीच्या विकासाचा सागरी सेतूमुळे श्रीगणेशा झाला आहे.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. या महामार्गाची लांबी ५२३ किलोमीटर दुपदरी रस्त्याऐवजी आता चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत तब्बल २६,४६३ कोटी रुपये झाली आहे. या पुलामुळे रेवदंडा ते साळाव भागांना समुद्रकिनारी रस्त्याने जोडणी मिळणार आहे. नव्या पुलामुळे मोडकळीस आलेल्या रेवदंडा पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. तसेच जुन्या पुलावरील भार कमी झाल्याने प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत होणार आहे. शिवाय स्थानिक नागरिक, पर्यटक, उद्योग-व्यवसाय तसेच मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे.
-----------------
विलंबाचे कारण
रेवस ते रेडी महामार्गाचे स्वप्न कोकणातील जनता गेली ४० वर्षांपासून बघत आहे. वारंवार बदलणारी योजना, पर्यावरणीय अडथळे, प्रशासकीय अडचणींमुळे हा प्रकल्प खोळंबला होता; मात्र आता सर्व आवश्यक मंजुरी मिळत असून विविध टप्प्यांतील कामांना गती दिली जाणार आहे.
-------------------
पर्यटनाचा महामार्ग
कुंडलिका खाडी पूल, रेवस ते रेडी सागरी महामार्गातील महत्त्वाचा टप्पा मानलो जातो. कोकण किनारपट्टीवरील दळणवळण अधिक गतिमान होऊन पर्यटन, व्यापार, उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या कामांना मिळालेली गती ही विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
-----
नेमलेले कंत्राटदार
रेवस-करंजा पुलाची - ॲफकॉनकडे
साळाव-रेवदंडा - अशोका बिल्डकॉनकडे
दिघी-आगरदांडा - हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन
----
पुलाची संरचना
एकूण लांबी : ३.८२ किमी
प्रशासकीय मान्यता रक्कम : १,७३६ कोटी
खासगी भूसंपादन ः ३२.६४ हेक्टर
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : ३ वर्षे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Maggi Video: डिग्रीपेक्षा कढई भारी? डोंगरात मॅगी विकून लाखोंची कमाई; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : भारत-युरोपियन संघाच्या मुक्त व्यापार करारावर सह्या : PM मोदी

Girish Mahajan Statement : 'आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो', प्रजासत्ताक दिनाच्या राड्यानंतर गिरीष महाजनांनी व्हिडिओ जारी करत दिलगिरी केली व्यक्त

वैभव सूर्यवंशीला पाकिस्तानी घाबरले; १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमधील India vs Pakistan लढतीवर बहिष्कार टाका! मिळाला अजब सल्ला...

रागाच्या भरात नाही, तर या कारणामुळे ओंकारने घेतला आलोक सिंग यांचा जीव, माजी आमदाराची पोस्ट चर्चेत!

SCROLL FOR NEXT