अलिबागच्या विकासाला शेकापने अडथळा आणला
भाजप कोंकण संघटक सतीश धारप यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३० : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला असून, सत्ताधारी शेकापवर नगर विकासाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने तीव्र टीका केली आहे. कोकण प्रदेशाचे भाजप संघटक सतीश धारप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शेकापच्या कार्यकाळातील अपयशांची यादी मांडत अलिबागच्या सर्वांगीण विकासाला जाणूनबुजून अडथळा आणल्याचा आरोप केला.
या वेळी सतीश धारप म्हणाले की, अलिबाग शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात शेकाप पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. एकाच घराण्याने वारंवार सत्ता राखून अलिबागकरांच्या प्रगतीला ब्रेक लावण्याचे काम केले. शहराला व्यापक विकास हवा होता, परंतु सत्ताधाऱ्यांनी त्या दिशेने एकही ठोस पाऊल उचलले नाही. धारप यांनी अलिबाग शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित करत, शहराच्या भविष्यासाठी हद्द वाढ ही अत्यावश्यक असूनही शेकापने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याची टीका केली. ते म्हणाले, अलिबागचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता हद्दवाढ अपरिहार्य आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी त्यासाठी कोणतीही प्रक्रिया राबवली नाही. भाजपला सत्ता दिल्यास हद्दवाढीची प्रक्रिया प्राधान्याने राबवली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
.............
नागरी कामांकडे दुर्लक्ष
शहराच्या भुयारी गटार योजनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही धारप यांनी केला. तांत्रिक कारणांचा आधार घेऊन गटार योजना मुद्दाम रखडवली. शहराच्या मूलभूत सुविधांकडे शेकापनं संपूर्णपणे पाठ फिरवली आहे, असे ते म्हणाले. अलिबाग शहरातील पाणीपुरवठ्याबाबतही असंतोष व्यक्त करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. पुरेशा पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. उपलब्ध स्रोत असूनही योग्य नियोजन न केल्यामुळे नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेकापच्या कारभारात पाणीपुरवठा व्यवस्थाही ढासळली आहे, असा आरोप त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.