मुंबई

अतितीव्र दिव्यांगांसाठी ‘निर्वाह भत्ता योजना’ उपलब्ध

CD

अतितीव्र दिव्यांगांसाठी ‘निर्वाह भत्ता योजना’ उपलब्ध
६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व अनिवार्य
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११ ः रायगड जिल्हा परिषदेकडून दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या शृंखलेत यावर्षी आणखी एक महत्त्वाची योजना समाविष्ट करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण निधीमधून अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे, या नावीन्यपूर्ण योजनेची घोषणा जिल्हा परिषदेने केली असून, यामुळे अनेक दिव्यांग नागरिकांना आर्थिक आधार मिळणार आहे.
या योजनेसाठी ३१ डिसेंबरपूर्वी परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयामध्ये सादर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आवश्यक अटी, शर्ती आणि कागदपत्रे जिल्हा परिषदेकडून निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी खास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध असून हे फॉर्म गटविकास अधिकारी कार्यालय, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायती स्तरावर ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना अर्ज भरणे सुलभ होईल. लाभार्थी हा रायगड जिल्ह्यातील रहिवासी आणि ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्ती असणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. या योजनेद्वारे अतितीव्र दिव्यांगांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
...........
दिव्यांगत्व प्रमाणपत्र गरजेचे
योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ६० टक्के किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. यासोबतच जिल्हा शल्यचिकित्सक किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे. केंद्र शासनाच्या नव्या नियमांनुसार यूडीआयडी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असून पूर्वीची इतर जुनी प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Match Fixing : भारतीय क्रिकेटवर पुन्हा मॅच फिक्सिंगचे सावट; चार खेळाडू निलंबित, नेमकं काय घडतंय?

Mickey Mouse: ‘मिकी माउस’ आता ‘सोरा एआय’वर; ‘ओपन एआय’मध्ये ‘डिस्ने’कडून एक अब्ज डॉलरची गुंतवणूक

MPSC and NET Exam : ‘एमपीएससी’, ‘नेट’ एकाच दिवशी; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी अन्‌ परीक्षेबाबत संभ्रम

Mango Seed Oil : आता 'हापूस'च्या कोयींपासून तयार होणार तेल अन् मँगो बटर; राजापुरात संशोधनाची कमाल, 'अशी' केली तेलनिर्मिती

Sahyadri Express : कोल्हापूर–मुंबई प्रवासासाठी हक्काची गाडी हरवली; सह्याद्री एक्स्प्रेसच्या विस्तारावर रेल्वेची उदासीन भूमिका

SCROLL FOR NEXT