मुंबई

खेलो इंडिया बीच गेम्समध्ये पिंच्याक सिलॅट क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा डंका पालीतील अनुज सरनाईकसह त्रिकुटाने पटकावले रौप्य पदक

CD

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राचा डंका
पालीतील अनुज सरनाईकसह त्रिकुटाने पटकावले रौप्य पदक
पाली, ता. १० (वार्ताहर) ः दीव येथील खेलो इंडिया बीच गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पिंच्याक सिलॅट या क्रीडा प्रकारातील ‘रेगू इवेंट’मध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक प्राप्त केले. या संघामध्ये रायगड जिल्ह्यातील पाली येथील अनुज सरनाईक याचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
दीव, दमण, दादरा आणि नगर हवेली येथे नुकतेच या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. पिंच्याक सिलॅट या मार्शल आर्ट प्रकारातील ‘रेगू’ (सांघिक) प्रकारात महाराष्ट्राच्या अनुज सरनाईक, अंशुल कांबळे आणि मुकेश चौधरी या त्रिकुटाने तांत्रिक कौशल्य आणि चपळाईचे दर्शन घडवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत रौप्य पदकावर नाव कोरले. विजेत्या खेळाडूंना भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या उपसंचालक भाविनी यांच्या हस्ते पदके प्रदान करून गौरविण्यात आले.
या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून या खेळाडूंचे कौतुक होत आहे. प्रामुख्याने अप्पर संचालक, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनालय नवनाथ फडतरे, किशोर येवले, मोहम्मद इक्बाल व नेहा साप्ते यांनी खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक केले.

रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा
पालीतील येथील अनुज सरनाईक याने राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर पडली आहे. ग्रामीण भागातील खेळाडू योग्य मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर देशाच्या नकाशावर चमकू शकतात, हे अनुजने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्याच्या या यशामुळे स्थानिक स्तरावर त्याचे विशेष अभिनंदन केले जात आहे. या आधीही अनुजने या क्रीडा प्रकारात अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्वरूपाची बक्षीसे मिळवली आहेत.

फोटो ओळ, पाली, रौप्य पडकासह अनुज सरनाईक सोबत प्रशिक्षक व मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT