ऋणमय गुरवला रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदक
अलिबाग, ता. २० (वार्ताहर) : गोवा-म्हापसा येथे पार पडलेल्या १३व्या राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग आणि मास रेसलिंग स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील थळ येथील ऋणमय अमोल गुरव (वय १०) याने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. चिंतामणराव केळकर महाविद्यालयात पाचवीत शिकत असलेल्या ऋणमयने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत १० वर्षांखालील गटातील मुलांमध्ये विजय मिळवला.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत हरियाना, दुसऱ्या फेरीत केरळ आणि अंतिम फेरीत गुजरातच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत ऋणमयने दमदार लढत दिली. मेघालय राज्याचे मास्तर श्री संस्थेचे अध्यक्षांच्या हस्ते त्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
यंदाच्या स्पर्धेत देशभरातील २० राज्यांतील ८०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ऋणमय अलिबाग येथे प्रशिक्षक संतोष कवळे व प्रशिक्षक रोहन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
----
फोटो ओळ : थळ येथील ऋणमय अमोल गुरव याने गोव्यात झालेल्या राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्रदान करताना उपस्थित मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.