मुंबई

निसर्गाचा अनोखा चमत्कार घोसाळेगडाच्या पायथ्याशी फुलली दुर्मिळ ''पिवळी देवसावर'' निसर्ग अभ्यास व प्रेमींसाठी एक मोठी पर्वणी

CD

निसर्गाचा अनोखा अविष्कार
घोसाळेगडाच्या पायथ्याशी फुलली दुर्मिळ ‘पिवळी देवसावर’ ः निसर्गप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी
पाली, ता. २४ (वार्ताहर) ः ऐतिहासिक घोसाळेगड परिसरात निसर्गाचा अनोखा अविष्कार पाहायला मिळत आहे. सामान्यतः लाल रंगाच्या फुलांनी बहरणारी देवसावर येथे चक्क पिवळ्या रंगात पाहायला मिळत आहे. हा प्रकार अत्यंत दुर्मिळ मानला जात असून, या पिवळ्या फुलांच्या झाडामुळे पर्यावरण अभ्यासकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
निसर्गतः देवसावर किंवा सावरीची फुले ही लाल रंगाचीच असतात. परंतु, क्वचित प्रसंगी पिवळी देवसावर बहरते. झाडातील अँथोसायनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे किंवा जनुकीय रचनेत बदल झाल्यामुळे या फुलांना पिवळा रंग प्राप्त होतो. रायगड जिल्ह्यात फणसाड अभयारण्य आणि महाराष्ट्रात अशा प्रकारची झाडे मोजक्याच ठिकाणी नोंदवली गेली आहेत. जानेवारी ते मार्च हा या झाडाचा बहराचा काळ असतो. पानगळ झालेली असताना फांद्यांवर ही पिवळी फुले येतात.

घोसाळेगड परिसरात आढळलेली ही पिवळी देवसावर केवळ सौंदर्याचा विषय नसून, तो निसर्गाच्या वैविध्याचा एक उत्तम नमुना आहे. जनुकीय बदलामुळे होणारा हा प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे. सध्या वाढते वणवे आणि अवैध वृक्षतोडीमुळे अशा दुर्मिळ प्रजाती धोक्यात येत आहेत. या विशिष्ट झाडाच्या बियांचे संकलन करून त्याचे संवर्धन करणे आणि अशा म्युटेशनचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने आणि वनविभागाने या झाडाला विशेष संरक्षण द्यावे, जेणेकरून भविष्यातील पिढीला हा निसर्ग ठेवा पाहता येईल.
- रोशन म्हात्रे, पर्यावरण अभ्यासक

एक बहुगुणी वृक्ष
याचे लाकूड हलके असल्याने आगपेट्या आणि खेळणी बनवण्यासाठी वापरले जाते. शेंगांमधील रेशमी कापूस (सिल्क कॉटन) उशा आणि गाद्यांसाठी उत्तम असतो. साल आणि डिंकाचा वापर पारंपरिक औषधांमध्ये अतिसार आणि रक्तदोष दूर करण्यासाठी होतो. मंदिर परिसरात पवित्र वृक्ष म्हणून लागवड आणि पूजन करण्याची प्रथा आहे.

संवर्धनाची गरज
जंगलांना लागणारे वणवे हे देवसावरीच्या झाडांसाठी मोठे शत्रू ठरत आहेत. शिवाय होळीच्या वेळेला देखील मोठ्या प्रमाणावर देवसावर झाडाची तोड केली जाते. घोसाळेगड हा पर्यटनाचा आणि ट्रेकिंगचा भाग असल्याने, पर्यटकांनी या झाडाची फुले तोडू नयेत किंवा झाडाला इजा पोहोचवू नये, असे आवाहन स्थानिक निसर्गप्रेमींकडून केले जात आहे.

बियांचे संकलन
वनस्पतीला बोंडे आल्यावर त्याच्या बिया संकलन करून लावल्यास या दुर्मिळ वनस्पतीचे संवर्धन करता येईल, अशी माहिती वनस्पती अभ्यासक अमित निंबाळकर यांनी दिली.


फोटो ओळ, पाली, दुर्मिळ पिवळी देवसावर झाड.

फोटो ओळ, पाली, दुर्मिळ पिवळी देवसावरचे फुल

फोटो ओळ, पाली, रोशन म्हात्रे, पर्यावरण अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT