मुंबई

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नेत्र तपासणी शिबीर

CD

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नेत्र तपासणी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अलिबाग कॅम्प येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण-रायगड यांच्या वतीने मोफत नेत्रतपासणी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कार्वेकर, डॉ. राजाराम हुलवान तसेच नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. श्रद्धा कुदळे यांनी नागरिकांची तपासणी केली. रायगड जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे सहकार्य या उपक्रमाला लाभले. शिबिरात ९० नागरिकांची मोफत नेत्रतपासणी तर ७८ नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली.
या वेळी वाहनचालक व मालकांना हेल्मेट व सीटबेल्टचे महत्त्व, गुड समॅरिटन नियम, गोल्डन अवर तसेच वाहन चालविताना मोबाईल वापर टाळण्याबाबत मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर यांनी मार्गदर्शन केले. अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे रस्ता अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

Stray Dogs Attack : मोकाट कुत्र्यांचा कहर; सात वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला!

Latest Marathi News Live Update :एलपीजीची परिस्थिती अजूनही चिंताजनक: सरकार

SCROLL FOR NEXT