शेतकरी कुटुंबातील तरुणाने मिळवली पीएचडी
पालीवाला महाविद्यालयाचे प्रा. संदेश गावडे यांना अर्थशास्त्र विषयात ‘विद्यावाचस्पती’
पाली, ता. २६ : सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक संदेश शांताराम गावडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अर्थशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘पर्यटन व्यवसायातील पायाभूत सुविधांचे चिकित्सक अध्ययन : कोकणातील पर्यटन व्यवसायाचा विशेष अभ्यास’ या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले. संगमनेर येथील संशोधन केंद्रात डॉ. प्रताप फलफले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रबंध सादर केला.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील उसर या छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रा. गावडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत शैक्षणिक वाटचाल घडवली. माणगाव येथील द. ग. तटकरे महाविद्यालयात त्यांनी दहा वर्षे अध्यापन केले असून, सध्या ते पालीवाला महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधनामध्ये कोकणातील पाचही जिल्ह्यांतील पर्यटन क्षेत्र, पायाभूत सुविधा तसेच आर्थिक व सामाजिक समस्यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
या यशाबद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीता पालरेचा, प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपचांग, माजी प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड, विभागप्रमुख डॉ. अनिल झेंडे, मार्गदर्शक डॉ. प्रताप फलफले यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. या यशामागे पत्नी प्रा. नेहा गावडे व कुटुंबीयांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
कोकणातील पर्यटन विकासाला दिशा
प्रा. गावडे यांच्या संशोधनामुळे कोकणातील पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधांवर प्रकाश पडणार असून, पर्यटनविकासाच्या धोरणात्मक नियोजनाला मदत होणार असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.
फोटो ओळ, पाली, प्रा. संदेश गावडे यांना पेढा भरवतांना सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीता पालरेचा. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, प्रा. संदेश गावडे यांचे अभिनंदन करतांना प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपचांग. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.