मुंबई

होळी व धुळवडीची रंगत स्वदेशी टिकाऊ पिचकार्‍यांना व इको फ्रेंडली रंगांना पसंती साखर माळ खरेदीची लगबग

CD

होळी व धुळवडीची रंगत
स्वदेशी टिकाऊ पिचकारी व नैसर्गिक रंगांना पसंत
पाली, ता. २६ (वार्ताहर) ः होळी व धुलिवंदननिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारातून चिनी माल हद्दपार झालेला दिसत आहे. तसेच, नैसर्गिक रंगांना ग्राहकांकडून अधिक मागणी मिळत आहे. रंग खरेदी करण्यासाठी लहानग्यांपासून तरुणापर्यंत सर्वच बाजारात रंगखरेदीसाठी गर्दी करत आहेत.
फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड असते. फाल्गुन वद्य पंचमीला रंग उधळण्याचा कार्यक्रम असतो. म्हणून ती रंगपंचमी असते. घाऊक व स्थानिक बाजारपेठेतदेखील अनेक दुकानदारांनी व ग्राहकांनी स्वदेशी मालाला पसंती दिली असून, चिनी माल नाकारला आहे. चिनी माल स्वस्त असला तरी तो निकृष्ट दर्जाचा आहे. ऑईलपेंट आणि इतर घातक रसायनांनी बनलेले रंगदेखील बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात हद्दपार झाले आहेत. त्याची जागा नैसर्गिक रंगांनी घेतली असून, ग्राहकांचीही पसंती मिळत आहे.

किमती स्थिर
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पिचकाऱ्या व रंगांच्या किमती स्थिर आहेत. विविध प्रकारच्या पिचकारी उपलब्ध आहेत. केमिकलयुक्त घातक रंगाला यंदा मागणी कमी असून, नैसर्गिक रंगांना अधिक आहे, असे विक्रेते नीरज गुप्ता यांनी सांगितले.

साखर माळांना मागणी
होळी व धुळवडनिमित्त साखर माळांना मोठी मागणी आहे. गावखेड्यातील लोक मोठ्या प्रमाणात साखर माळांची खरेदी करतात. लहानग्यांमध्ये अजूनही त्याचे आकर्षण टिकून आहे. याबरोबरच रंग व पिचकारी खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत, असे विक्रेते नीलेश गुप्ता यांनी सांगितले.


फोटो ओळ, पाली, साखर माळ व पिचकाऱ्या खरेदी करताना ग्राहक. (छायाचित्र, अमित गवळे)


फोटो ओळ, पाली, स्वदेशी बनावटीच्या पिचकाऱ्या व इकोफ्रेंडली रंग खरेदी करताना. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT