मुंबई

दुधणीमध्ये अंगणवाडीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

CD

दुधणीमध्ये अंगणवाडीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन
सीएसआर निधीतून साकार होणार पहिली हक्काची वास्तू
पाली, ता. २८ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील ताडगाव ग्रामपंचायत हद्दीतील दुधणी गावासाठी २५ फेब्रुवारी २०२६ हा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावात अधिकृत अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन जिल्हा परिषद शाळेजवळ उत्साहात पार पडले. या इमारतीमुळे चिमुकल्यांना सुरक्षित व सुसज्ज जागा मिळणार असून, गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला नवे बळ मिळणार आहे.
यापूर्वी स्वरदिव्या वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून भाड्याच्या खोलीत तात्पुरत्या स्वरूपात हे केंद्र सुरू होते. जून २०२५ मध्ये महिला व बालविकास विभागामार्फत पीव्हीटीजी अंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर सरपंच करुणा भिमचंद्र साठे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यता मिळवली. इमारतीसाठी लागणारा निधी सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमिटेड, आमडोशी (रोहा) यांनी सीएसआर अंतर्गत उपलब्ध करून दिला आहे.
या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी लता मोहिते, बाल विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विता करंगुटकर, कंपनीचे प्रतिनिधी सुभाष पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंगणवाडी ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची पायाभरणी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ताडगाव ग्रामपंचायत व टीकेडीके परिसर विकास संघर्ष समितीने उपस्थितांचे आभार मानले.

चौकट
दुर्गम भागाच्या विकासाला गती
सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या सीएसआर निधीतून साकार होणारी ही इमारत केवळ दुधणीपुरती मर्यादित नसून तालुक्यातील दुर्गम भागातील शिक्षण, पोषण व बालविकासासाठी नवा आदर्श ठरणार आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण, पोषण आहार व आरोग्य सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्याने गावाच्या सर्वांगीण विकासाला दीर्घकालीन चालना मिळणार आहे.

फोटो ओळ, पाली, अंगणवाडी भूमिपूजन वेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी व ग्रामस्थ. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-US War: ट्रम्प यांचा पुढचा प्लॅन रेडी! इराणवर हल्ला केल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Palghar News: उंदरांचे वास्तव्य, सांडपाणी, दुर्गंधी अन्..., तलासरीतील अंगणवाडीला कुलूप; अस्वच्छतेमुळे बालआरोग्यावर प्रश्नचिन्ह

Yeola News : येवल्यात आता प्लास्टिक वापरला तर खिसा रिकामा होणार! नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : स्मार्ट मीटर वादावर तोडगा; वाढीव वीजबिलांसाठी हप्त्यांची सुविधा मंजूर

Ranji Trophy Final: बॅग भर अन् निघ... रात्री ९:३० चा फोन कॉल अन् पठ्ठ्यानं एका रात्रीत फायनल गाठून ठोकलं दीडशतक

SCROLL FOR NEXT