मुंबई

नवघर शाळेत विज्ञानाचा जागर

CD

नवघर शाळेत विज्ञानाचा जागर
प्रयोगांतून विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी; ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १ : दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देत नवघर येथील शाळेत ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’निमित्त आयोजित विज्ञान सोहळा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र येथील सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक व सुधागडचे सुपुत्र करुण हंबीर यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करत गुंतागुंतीच्या संकल्पना अत्यंत सोप्या व रंजक पद्धतीने समजावून सांगितल्या.
हवेचा दाब व पोकळी, जलशुद्धीकरण प्रक्रिया, आपकेंद्री व अभिकेंद्री बल, आवाजाच्या लहरींचा प्रवास तसेच ॲसिडसंबंधी प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरले. प्रयोगांमागील निष्कर्ष विद्यार्थ्यांकडूनच काढून घेतल्याने त्यांचा सहभाग वाढला आणि विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका संगीता बैकर यांनी करुण हंबीर यांचे स्वागत केले. वृषाली गुरव यांनी परिचय करून दिला, तर शितल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख अनिल राणे, प्रशांत गुरव यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपशिक्षक रुपाली लेंडवे व अंकिता जाधव यांनी परिश्रम घेतले.

चौकट
प्रयोगाधारित शिक्षणाची गरज
पाठांतरापेक्षा प्रत्यक्ष प्रयोगांमधून विज्ञान शिकवल्यास विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, निरीक्षणशक्ती व तर्कशक्ती वाढते, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

फोटो ओळ, पाली, विविध प्रयोग दाखवताना करुण हंबीर व उपस्थित शिक्षक, मान्यवर व विद्यार्थी. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Interim Supreme Leader : अयातुल्ला अराफी बनणार इराणचे सर्वोच्च नेते ! खामेनी यांच्या मृत्युनंतर मोठी जबाबदारी

How Much Prize Money Will Pakistan Get? पाकिस्तानी २७-२८ कोटी जिंकण्याच्या इराद्याने आले होते, बघा किती बक्षीस रक्कमेवर समाधान मानावे लागले...

इराण-अमेरिका युद्धादरम्यान दुबई आणि UAE मध्ये अडकल्या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री ; "अत्यंत भीतीदायक वातावरण.."

Sakal Property Mahayatra : नाशिकमध्ये घराचं स्वप्न आता होणार पूर्ण! मालेगावात 'सकाळ प्रॉपर्टी महायात्रा' प्रदर्शनाचा दिमाखदार प्रारंभ

karad Crime: कऱ्हाडमध्ये आणखी एक बांगलादेशी महिला ताब्यात; पाेलिसांचा मलकापुरात छापा, दुसऱ्या नावाचे आधारकार्ड!

SCROLL FOR NEXT