मुंबई

अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा; वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा

CD

अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा; वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा
रायगडमध्ये ‘चमत्कारामागील विज्ञान’ उपक्रमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन
पाली, ता. १ (वार्ताहर) : ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (मअंनिस) रायगड शाखेतर्फे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ‘चमत्कारामागील विज्ञान’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. प्रयोग व प्रभावी व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेपासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
पाली येथील ग. बा. वडेर हायस्कूलमध्ये जिल्हा प्रधान सचिव अमित निंबाळकर यांनी भोंदूगिरीमागील वैज्ञानिक तत्त्वे प्रत्यक्ष प्रयोगांसह स्पष्ट केली. तर सार्वजनिक विद्यालय पेण येथे विज्ञान प्रदर्शनादरम्यान जगदीश डंगर यांनी मांत्रिकाच्या वेशात हातचलाखीचे प्रयोग सादर करून लोकांची कशी फसवणूक होते, हे दाखवून दिले. जिल्हा कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांनी “चला वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवूया” या विषयावर मार्गदर्शन करत भूत, जादूटोणा यासारख्या समजुतींना शास्त्रीय आधार नसल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
चौकट
कार्यकारणभावातूनच अंधश्रद्धा निर्मूलन
“विज्ञानाच्या युगातही चमत्कारांच्या नावाखाली समाजाची दिशाभूल होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधण्याची सवय लावून डोळसपणे विचार केला तरच अंधश्रद्धा नष्ट होईल,” असे संदेश गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

Viral Video : 'स्वतः कर्णधारपद सोडणार की PCB हकालपट्टी करणार?' पाकिस्तानी पत्रकाराचा थेट प्रश्न, सलमान अली आघा म्हणाला...

Mumbai News: घरेलू कामगारांचा सरकारला अल्टिमेटम, अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुदीची करावी; नेमक्या मागण्या काय?

T20 WC, SA vs ZIM: दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा विजय... उपांत्य फेरीत न्यूझीलंडला भिडणार; दुसऱ्या Semi मध्ये इंग्लंड विरुद्ध....

SCROLL FOR NEXT