होळीत अवजड ‘दगड-गोटा’ उचलण्याची रांगडी परंपरा
पालीत ६४ वर्षीय संजय यांनी ६५ किलोचा धोंडा उचलून तरुणांना दिला फिटनेस मंत्र
पाली, ता. ३ (वार्ताहर) ः होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण आणि उत्साहाचे वातावरण असते. या सणादिवशी पाली येथील गवळी समाजाच्या होळीत एक अनोखी आणि ऐतिहासिक प्रथा जोपासली जाते. या वेळी अवजड ‘दगड-गोटा’ उचलून होळीला प्रदक्षिणा मारायची असते. यंदा ६४ वर्षीय संजय घोसाळकर यांनी ६५ किलो वजनाचा दगड उचलून तरुणांसमोर फिटनेसचे एक आदर्श उदाहरण ठेवले.
पालीत होळीच्या माळावर वेगवेगळ्या आकाराचे आणि वजनाचे जड, गोल दगड-गोटे ठेवलेले असतात. या दगडांना स्थानिक भाषेत ताकदीचे प्रतीक मानले जाते. हे जड दगड उचलून आपली शारीरिक क्षमता सिद्ध करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. येथील ६४ वर्षीय संजय घोसाळकर यांनी चक्क ६५ किलो वजनाचा पारंपरिक धोंडा (दगड) उचलला.
वयाची साठी ओलांडलेली असतानाही त्यांनी कमालीच्या चपळाईने ६५ किलो वजनाचा गोल दगड सहज उचलला आणि खांद्यावर घेऊन होळीभोवती प्रदक्षिणादेखील मारली. हे दृश्य पाहून उपस्थित तरुण मुलांच्याही भुवया उंचावल्या. केवळ दगड उचलणे हा त्यांचा उद्देश नव्हता, तर आजच्या धावपळीच्या युगात शारीरिक तंदुरुस्त ठेवणे हा संदेश देणे त्याचा मुख्य हेतू होता. आजची तरुण पिढी व्यायामाकडे दुर्लक्ष करीत आहे. तुम्हाला तुमचे आयुष्य वाढवायचे असेल, तर शरीर तंदुरुस्त ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे संजय घोसाळकर यांनी सांगितले.
फोटो ओळ,
पाली ः ६५ किलोचा दगड-गोटा खांद्यावर उचलून घेताना संजय घोसाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.