मुंबई

शेकडो पुरणपोळ्या आगी ऐवजी गेल्या गरिबांच्या पोटात आदिवासी गोरगरीब व वृद्धांची होळी झाली गोड आणि आंनदी जिल्ह्यात महा. अंनिस व समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून पुरणपोळ्या व फळांचे वाटप

CD

शेकडो पुरणपोळ्या आगीऐवजी गरिबांच्या पोटात
आदिवासी व वृद्धांची होळी गोड आणि आनंदी
जिल्ह्यात अंनिस व समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून पुरणपोळ्या व फळांचे वाटप
पाली, ता. ३ (वार्ताहर) ः होळीच्या सणाला सामाजिक जाणिवेची जोड देत रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि इतर दानशूर नागरिकांच्या पुढाकाराने होळीनिमित्त जमा झालेल्या शेकडो पुरणपोळ्या आणि फळे आदिवासीवाड्या, झोपडपट्टी आणि वृद्धाश्रमांमधील गरजूंना वाटप करण्यात आले.
पालीत एक संघर्ष समाजसेवेचा व अंनिसतर्फे मागील ११ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येतो. पालीतील लहान-मोठ्या होळ्या येथून जवळपास एक हजारपेक्षा जास्त पुरणपोळ्या जमा करण्यात आल्या. याशिवाय, फळे आणि पापड-फेण्याही वाटपासाठी गोळा करण्यात आल्या. येथील तळई व दापोडे आदिवासीवाडी आणि टेंभी वसाहत येथे पुरणपोळ्या पापड-फेण्याचे वाटप करण्यात आले. मयूर थळे, श्रीकांत ठोंबरे, संदेश सोनकर, संदीप महाडिक, किशोर चौधरी, रोशन रुईकर व अमित निंबाळकर आदींनी हा उपक्रम यशस्वी केला.
तर रोहा अंनिस शाखेच्या वतीने माळखंड वाडी येथील श्री काळकाई प्रसन्न वृद्धाश्रमामध्ये पुरणपोळ्या आणि फळांचे वाटप केले. या वेळी रोहा शाखा निस शाखा अध्यक्ष डॉ. फरीद चिमावकर, उपाध्यक्ष दत्तात्रेय शेडगे, सचिव दिनेश शिर्के यांच्यासह अनिकेत पाडसे, मुमताज मुलानी, धनाजी जाधव, प्रमोद खांडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच पेण शाखेतर्फेदेखील रेल्वेलाइनला लागून असलेल्या झोपडपट्टीतील लहान मुले आणि महिलांना पुरणपोळ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी रमाकांत घरत आणि संदेश गायकवाड उपस्थित होते.

‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम अनेकांनी उत्स्फूर्तपणे अवलंबला आहे. बहुतांश होळी मंडळे आणि रोटरी क्लबसारख्या संस्था स्वतः पुरणपोळ्या वाटप करू लागल्या आहेत. ही एक चांगली आणि स्वागतार्ह बाब आहे. जो विचार फक्त आमचा होता तो आता आपल्या सर्वांचा झाला आहे. होळी सणाच्या या विशेषप्रसंगी, हा उपक्रम समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने यशस्वी झाला आहे.
- संदेश गायकवाड, कार्याध्यक्ष, अंनिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT