उष्णतेच्या लाटेने अंगाची लाहीलाही
जिल्ह्यातील तापमाण ३६ अंशावर; पुढील दोन दिवस उकाडा वाढणार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : कोकण किनारपट्टीसह रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट आणि उकाड्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तापमानात वाढ आणि हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहणार असल्याने नागरिकांना उष्ण व दमट वातावरणाचा सामना करावा लागणार आहे.
सर्वाधिक तापमाणाच्या झळा पाटणूस, भिरा परिसरात जाणवत आहेत. येथील उष्णतेचा पारा ४० अंशाहून पुढे गेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा काही अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवणार असून, किनारी भागात उकाड्याची तीव्रता वाढेल. अलिबाग, उरण, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा तसेच पेण व पनवेल परिसरात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दोन दिवसांत वाढलेल्या तापमामामुळे बाजारपेठाही दुपारनंतर निर्मनुष्य दिसत असून, रस्त्यावरील रहदारीही कमी झाली आहे.
दरम्यान, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, अशक्तपणा यांसारखी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल अपेक्षित नसल्याने उकाड्याचा त्रास कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे तसेच हलके व सैल कपडे वापरावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
- डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.