

Missing Link become Picnic Spot
ESakal
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘कनेक्टिंग लिंक’चे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. या मार्गांमुळे मुंबई व पुणे दरम्यान प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटांनी कमी झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र दुसरीकडे हा मार्ग एक पर्यटन स्थळ बनत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.