मुंबई

पोलीस कार्यप्रणालीचा ''नामदेव सुर्वे लॉ कॉलेज''च्या विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांचे मार्गदर्शन

CD

पोलिस कार्यप्रणालीचा विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव
पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांचे मार्गदर्शन
पाली, ता. ११ (वार्ताहर) ः विधी शाखेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासनाचे कामकाज, गुन्ह्यांचे स्वरूप आणि कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, हे समजून घेणे आवश्यक असते. याच उद्देशाने माणगाव येथील नामदेव सुर्वे लॉ कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच माणगाव पोलिस ठाण्याला भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यांना माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या अभ्यास दौऱ्याप्रसंगी नामदेव सुर्वे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती दिली. गुन्हा घडल्यानंतर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) कसा नोंदवला जातो आणि त्याचे कायदेशीर महत्त्व काय असते, याची माहिती दिली. गुन्ह्याचा तपास करताना पुरावे गोळा करणे, पंचनामा करणे आणि दोषारोपपत्र न्यायालयात सादर करेपर्यंतची प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली. आरोपीला ताब्यात घेतल्यावर त्याचे कायदेशीर हक्क आणि कोठडीतील नियमावलीबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. सद्यस्थितीत वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे आणि कायद्याने त्याकडे कसे पाहावे, यावरही त्यांनी भाष्य केले.

केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यातील विविध विभागाची व कार्यप्रणालीची माहिती घेतली. पोलिस आणि वकील हे न्यायव्यवस्थेचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांमध्ये समन्वय असणे किती गरजेचे आहे. या उपक्रमामुळे विधी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, भविष्यात वकील म्हणून काम करताना या अनुभवाचा मोठा फायदा होईल.
- डॉ. रवींद्र राठोड, प्राचार्य, नामदेव सुर्वे लॉ कॉलेज, माणगाव

फोटो ओळ,
पाली ः पोलिस ठाणे भेटीदरम्यान उपस्थित विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा शपथविधी १० वाजता, राहुल गांधीसह मान्यवरांची उपस्थिती; ज्योतिषांनी शपथविधीची वेळ बदलली

Mother's Day 2026: ‘मदर्स डे’ची सुरुवात करणारी महिलाच शेवटी त्याच्या विरोधात का उभी राहिली?

साप्ताहिक राशिभविष्य : (१० मे २०२६ ते १६ मे २०२६)

मेष साप्ताहिक राशिभविष्य (१० मे २०२६ ते १६ मे २०२६) : भागीदारीतील अडथळे दूर होणार, करिअरमध्ये नवे मार्ग सापडणार

Sunday Special Breakfast: रविवारी नाश्त्याला बनवा स्पेशल 'पोहा नारियल इडली', पाहा या रेसिपीचा सोपा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT