मुंबई

सुधागड पंचायत समितीवर महायुतीची सत्ता इतिहासात प्रथमच भाजपला सभापती पदाचा मान सभापती पदी भाजपच्या जागृती मानकर तर उपसभापती पदी राष्ट्रवादीचे संदेश शेवाळे

CD

सुधागड पंचायत समितीवर महायुतीची सत्ता
इतिहासात प्रथमच भाजपला सभापती पदाचा मान
पाली, ता. ११ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया बुधवारी (ता. ११) पार पडली. यामध्ये सुधागड पाली पंचायत समितीवर भाजप, अजित पवार गट आणि रिपाइं महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या जागृती मानकर यांची, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे सुधागडच्या राजकीय इतिहासात प्रथमच भाजपच्या सभापती विराजमान झाल्या असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
खासदार सुनील तटकरे व माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्याकडून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. महायुतीची सत्ता स्थापन होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी सदस्य म्हणून भाजपच्या सुनीता किसन लेंडी यांचीही वर्णी लागली आहे. या यशाबद्दल बोलताना धैर्यशील पाटील म्हणाले की, आजचा दिवस सुधागड तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी जनतेच्या हितासाठी शाश्वत विकासाची कामे करतील. भाजप नेते प्रकाश देसाई यांनी पाली पंचायत समितीतील ही युती यशस्वी झाली असून, आगामी काळात रायगड जिल्हा परिषदेवरही भाजपचाच अध्यक्ष विराजमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी भाजप महिला सरचिटणीस गीता पालरेचा, दादा कारखानीस, ग.रा. म्हात्रे, सतीश देसाई, रवींद्र देशमुख, मिलिंद देशमुख, आलाप मेहता, पराग मेहता, श्रीकांत ठोंबरे, सुलतान बेणसेकर, आरिफ मणियार, सुधीर भालेराव, विलास पालवे, रुपाली भणगे, ललित ठोंबरे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार उत्तम कुंभार आणि नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच गटविकास अधिकारी लता मोहिते व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विकासाला गती देणार
जागृती मानकर यांनी सुधागडसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. सामान्य माणूस विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे. संदेश शेवाळे यांनीही वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासाला गती देण्याची ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT