प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित
१५ दिवसांत अतिक्रमणावर ठोस कारवाई करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे पत्र
पाली, ता. १२ (वार्ताहर) ः पाली नगर पंचायत हद्दीतील बेघरआळी येथील समाजमंदिराच्या जागेवरील अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांकडून साखळी उपोषण सुरू होते. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मंगळवारी (ता. ११) नगर पंचायत मुख्याधिकारी आणि पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना येत्या १५ दिवसांत संबंधित अतिक्रमणावर ठोस कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले.
बेघरआळी येथील होळीमाळ परिसरातील ४० वर्षे जुन्या समाजमंदिरालगतच्या मोकळ्या जागेवर ‘घरकुल’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामात अतिक्रमण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता. डिसेंबर २०२५ पासून वारंवार तक्रारी करूनही केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. याविरोधात मंगळवार (ता. १०)पासून ग्रामस्थांनी नगर पंचायत कार्यालयाखाली उपोषण सुरू केले होते.
अखेर नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर गुरुवारी (ता. १२) उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. अतिक्रमाणावर प्रशासनाने कारवाईसाठी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. या मुदतीत ठोस कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थ पुन्हा तीव्र आंदोलन छेडतील, असे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले. या वेळी सागर मिसाळ, ललित ठोंबरे, संजय वझरकर, आकाश दळवी यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळ ः पाली मुख्याधिकारी व पोलिस प्रशासनाकडून लेखी पत्र स्वीकारून साखळी उपोषण मागे घेताना आंदोलक व ग्रामस्थ. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.