मुंबई

पाली प्रारूप विकास आराखडा बैठक ठरली वादळी अधिकारी व नागरिकांमध्ये खडाजंगी सभा निम्यावरच गुंडाळली

CD

पाली प्रारूप विकास आराखडा बैठक वादळी
अधिकारी व नागरिकांमध्ये खडाजंगी ः सभा निम्यावरच गुंडाळली
पाली, ता. १२ (वार्ताहर) ः पाली नगरपंचायत क्षेत्राच्या प्रारूप विकास योजनेबाबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठक मंगळवारी (ता. १०) आयोजित केली होती. परंतु, या बैठकीत नागरिक-अधिकाऱ्यांमध्ये खडजंगी झाल्याचे पाहायला मिळाले असल्याने सभा वादळ ठरली. विकास आराखडा नेमका काय आहे, हे स्पष्ट न करताच अधिकाऱ्यांनी सूचना मागवल्यामुळे नागरिक आक्रमक झाले. अखेर ही सभा कोणतीही ठोस निष्पत्ती न निघताच सभा निम्यावरच गुंडाळण्यात आली.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमानुसार पाली नगरपंचायत क्षेत्रासाठी विकास योजना तयार करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी, विकासक आणि नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी भक्तनिवास क्रमांक एकच्या सभागृहात ही बैठक बोलावली होती. बैठकीत अतिक्रमण, डंपिंग ग्राऊंड आणि रस्ते यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना नागरिकांनी मूलभूत प्रश्न उपस्थित केला. विकास आराखडा आधी समोर ठेवा, तो पाहिल्याशिवाय आम्ही सूचना कशा देणार, अशी विचारणा नागरिकांनी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी आराखडा सादर करण्याऐवजी केवळ सूचना नोंदवण्याचा आग्रह धरल्याने वादाची ठिणगी पडली.
चर्चेदरम्यान नगर रचना विभागाचे अधिकारी महेंद्र पवार यांनी नागरिक अनुपम कुलकर्णी यांना तुम्ही सभेच्या उलट बोलत आहात, असे म्हटल्याने वातावरण अधिकच तापले. त्यावर कुलकर्णी यांनी आक्रमक होत, अधिकाऱ्यांना प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याने ते नागरिकांचा आवाज दाबत आहेत, असा आरोप केला. या शाब्दिक बाचाबाचीमुळे सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. हे पाहून अधिकारी महेंद्र पवार यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. यामुळे विकास योजनेबाबत नागरिकांची मते आणि सूचना नोंदविण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. आता प्रशासन यावर पुन्हा बैठक घेणार की पुढील काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीला नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, सहायक संचालक, नगर रचना, अलिबाग महेंद्र पवार, नगरपंचायत प्रभारी प्रशासकीय अधिकारी कोमल कराळे तसेच सर्व नगरसेवक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळ, पाली येथे विकास आराखड्याच्या बैठकीत आपली बाजू मांडताना नागरिक आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नगर रचना विभागाचे अधिकारी. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

तो ऑडिओ हटवा नाहीतर... ते संभाषण लीक झाल्याने संतापली रश्मिका मंदाना; कारवाई करणार, नेमकं प्रकरण काय?

Indian Tourists : घर हलल्यासारखे झाले अन् आमची झोप उडाली, दुबईतील आँखो देखा हाल; क्षेपणास्त्र पडत होती....

Madha News : माढा पंचायत समितीच्या सभापतीपदी पंडित देशमुख; उपसभापतीपदी स्वाती गिड्डे यांची बिनविरोध निवड

"संजूने तुझी जागा घेतली म्हणून..."; Shubman Gill ने मुद्दाम टीम इंडियाच्या फोटोतून संजूला क्रॉप केल? नेटिझन्सकडून आरोप, एकाने तर...

SCROLL FOR NEXT